Uncategorized
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला लागणार निकाल…
अहिल्यानगर – अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर कार आज निवडणूक आयोगाने विधानसभा 2024 निवडणुकीच्या तारखा जाहिर केल्या आहे. महाराष्ट्रा मध्ये एकाच टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये निवडणुका पार पडणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यात निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल हाती लागणार आहे.
राज्यात एकाच टप्प्यात होणाऱ्या मतदान प्रक्रिया निवडणुकीत 22 ते 29 ऑक्टॉबर पर्यत अर्ज भरावयाचे आहे तसेच 30 ऑकटोबरला अर्जाची छाननी होणार आहे 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीचा अंतिम दिवस असणार असून 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान पार पडणार आहे. राज्यात तब्ब्ल 9 कोटी 63 लाख मतदार असून 1 लाख 86 हजार मतदान केंद्र असणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे….