कामगाराने केला मालकाचा घात ; कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करणाऱ्यां पाच आरोपीना LCB ने केली अटक ; लाखों रुपयांची रोख रक्कम हस्तगत ; हल्लेखोरांमध्ये हमालाचा समावेश
अहमदनगर – कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करून 50 लाखाची रक्कम लंपास करणाऱ्यां आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 20 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. शनिवारी भर दिवसा कांदा मार्केट समोर कांदा व्यापारी समीर शेख व त्यांच्या बंधूवर अज्ञात आरोपीनी धारदार शस्त्राने हल्ला करत 50 लाखांची रोकड लंपास केली होती. या हल्ल्यात व्यापारी शेख हे गंभीर जखमी झाले होते. घटनेचे गंभीर्य बघता पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. पोलिसांनी cctv फुटेज तसेच तांत्रिक दृष्ट्या तपास करत 4 आरोपी राहूरी येथून तर 1 आरोपीला अहमदनगर मधून अटक केली आहे.
विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये हमालाचा समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे. यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये मुबारक अत्तार,सुनील माळी,अक्षय बाचकर,मयूर गायकवाड,मनोज शिरसाठ यांचा समावेश आहे. तर मुबारक आत्तार हे व्यापारी शेख यांच्याकडे कामाला होता मात्र दोघां मध्ये वाद झाल्याने व्यापारी शेख याने हमाल आत्तार याला कामावरून काढले होते. दरम्यान हमाल आत्तार आणि त्याचा मित्र हमाल संजय चव्हाण यांनी व्यापारी शेख यांना लुटाण्याचा प्लॅन आखला आणि फरार असलेल्या सहकाऱ्यांना हाताशी धरून हल्ला चढवला असल्याचे कबूल केले आहे. यामध्ये पोलिसांनी 5 आरोपीना अटक केली असून फरार असलेल्या 5 जणांचा शोध पोलीस घेत आहे….