तुतारीला बसणार फटका? “या” नेत्याचा जगतापांना पाठींबा – पहा नेमकं घडलंय काय…
अहिल्यानगर :- नगर शहर मतदारसंघांमध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्यापासून महाविकास आघाडी मध्ये नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, आता तर थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक यांनी संग्राम जगताप यांना पाठिंबा दिल्याने याचा फटका निवडणुकीमध्ये तुतारीला बसण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे?
गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत आहे मात्र तरी देखील नगर मतदारसंघात शिवसेनेला विधानसभेची जागा न मिळाल्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्था आहे आणि त्यातलाच मी एक शिवसैनिक असल्याने आता विकासाला साथ देण्यासाठी महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठींबा देत असल्याची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश कवडे यांनी घेतली आहे.
शहराच्या नालेगाव या परिसरामध्ये बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारे आणि त्यांच्या विचारावर चालणारे अनेक शिवसैनिक आहे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीत शहर मतदार संघाची जागा महाविकास आघाडी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्याने अनेकांमधून नाराजीचा सुर निघत आहे. खरंतर आघाडीत बिघाडी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनचं झाली होती. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. काही दिवसांनी गाडे यांनी जरी शरद पवारांच्या उमेदवाराला पाठींबा दिला असला तरी गाडे यांचा अधिकृत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल असल्याने मतांचे विभाजन होणार आहे?. आणि त्यात आता जाहीरपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश कवडे यांनी संग्राम जगताप यांना पाठींबा दिल्याने आघाडीच्या तुतारीला किती फटका बसणार हे हे येत्या काही दिवसातचं कळेल एवढेच….