Uncategorized
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या सरचिटणीसपदी सामाजिक कार्यकर्ते शहानवाज पठाण यांची नियुक्ती…
अहिल्यानगर :- शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या सरचिटणीस पदी गोविंदपुरा येथील सामाजिक कार्यकर्ते शहानवाज पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. शाहनवाज पठाण यांना ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, दत्ता कावरे आणि कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शाहानवाज पठाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अल्पसंख्यांक विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी मुकुंद नगर परिसरातील गोविंदपुरा या भागातील सामाजिक कार्यकर्ते पठाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, या कार्यक्रमाप्रसंगी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…