शहरातील “या” भागात दहशत करणाऱ्या गुन्हेगाराला भिंगार कॅम्प पोलिसांनी MPDA कायद्यान्वये केले स्थानबद्ध
अहिल्यानगर :- अहिल्यानगर शहरातील सारसनगर भागातील सराईत गुन्हेगार ऋषिकेश उर्फ भावड्या बडे या गुन्हेगाराला भिंगार कॅम्प पोलिसांनी MPDA कायद्यान्वये ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध केले आहे. आरोपीवर सारस नगर परिसरासह इतर परिसरात दहशत माजविने खुनाचा प्रयत्न, दरोडा,खंडणी वाहणाचे नुकसान करून वाहन पेटविणे असे अनेक गंभीर सावरूपाचे गुन्हे दाखल असून त्याने तेथे राहणाऱ्या लोकांवर दहशत केली होती. त्यामुळे सारसनगर परिसरात कायदा व सुव्यवस्था बाधित झाली होती.
कायदा व सुव्यवस्था बाधित झाल्याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी MPDA कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाची बाराकाईने पडताळणी करून शिफारस अहवालासह जिल्हान्याय दांडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्या प्रस्तावनुसार जिल्हा दंडाधिकारी यांनी सराईत गुन्हेगार ऋषिकेश उर्फ भावड्या याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी आरोपी भावड्या याला ताब्यात घेऊन नाशिक कारागृह येथे स्थानबद्ध केले आहे