सस्पेन्स संपला! आत्तापर्यंत महायुतीच्या मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी? पाहा संपूर्ण यादी
अहिल्यानगर :- रविवारी सकाळपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सायंकाळी चार वाजता नागपूर येथील राजभवनात मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार आहे. महायुतीच्या मंत्रीमंडळात कुणाला स्थान मिळणार, याबाबत मागच्या काही दिवसांपासून सस्पेन्स वाढला होता.
महायुतीचे अनेक आमदार शपथविधीसाठी नागपुरला पोहोचले आहेत. तर काहीजण नागपूरसाठी रवाना झाले आहेत. आता कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार, हे अजून निश्चित झालं नसलं तरी मंत्रीमंडळात कोण असणार हे निश्चित झालं आहे. तिन्ही पक्षाकडून आतापर्यंत ४० नावं समोर आली आहेत. यात सर्वाधिक भाजपचे १९, शिवसेना शिंदे गट १० तर अजित पवार गटाकडून ११ नावं समोर आली आहेत. आता कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळाली, आतापर्यंत कुणाची नावं समोर आली, पाहुयात…
भाजपकडून निश्चित झालेली नावं
१. देवेंद्र फडणवीस
२. गिरीश महाजन
३. चंद्रकांत पाटील
४. पंकजा मुंडे
५. राधाकृष्ण विखे पाटील
६. मंगलप्रभात लोढा
७. जयकुमार रावल
८. नितेश राणे
९. शिवेंद्रराजे भोसले
१०. पंकज भोयर
११. गणेश नाईक
१२. मेघना बोर्डीकर
१३. माधुरी मिसाळ
१४. अतुल सावे
१५. संजय सावकरे
१६. आकाश फुंडकर
१७. अशोक उईके
१८. आशिष शेलार
१९. जयकुमार गोरे
शिवसेना (शिंदे गट)
१. एकनाथ शिंदे
२. संजय शिरसाट
३. गुलाबराव पाटील
४. दादा भुसे
५. उदय सामंत
६. शंभूराज देसाई
७. योगेश कदम
८. प्रकाश आबिटकर
९. प्रताप सरनाईक
१०. आशिष जयस्वाल
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
१. अजित पवार
२. नरहरी झिरवळ
३. हसन मुश्रीफ
४. अनिल भानुदास पाटील
५. अदिती तटकरे
६. बाबासाहेब पाटील
७. दत्तात्रय भरणे
८. सना मलिक
९. इंद्रनील नाईक
१०. धनंजय मुंडे
११. माणिकराव कोकाटे
महायुतीकडून ही नावे समोर आली असून अनेक दिग्गजांचीं नावे यादीत नसल्याने त्यांना मंत्रीपद मिळणार की नाही याबाबत देखील सस्पेन्स कायम आहे. तसेच आलेल्या यादीतून देखिक काही नावे वागळण्याची शक्यता असल्याने आणखीन नावे वाढणार की यादीत असलेले अनेक नावे कमी होणार याकडे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे..