संगमनेर तालुक्यात आज विखेंची सभा तर विखेंना गाव बंदी नाहीचं! ; सोशल मीडियावर विखे – थोरात कार्यकर्त्यांचे वर्चुअल वॉर सुरु..
शिर्डी :- सुजय विखे पाटील यांना संगमनेर तालुक्यातील कोणत्याही गावात गाव बंदी करण्यात आलेली नाही. तशी मागणी थोरात समर्थकांकडून काही प्रमाणात करण्यात आली होती मात्र सुजय विखेंची आज पुन्हा संगमनेर तालुक्यात सभा असल्याने गाव बंदीची अफवा ही सोशल मीडियावर सुरु असून हे वर्चुअल वॉर असल्याचे सिद्ध दिसत आहे!
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ या गावात वसंत देशमुख यांनी थोरात यांच्या विरोधात आक्षेपर्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे संतप्त थोरात समर्थकांनीं विखे समर्थकांच्या गाड्याची तोडफोड करत गाड्या पेटवून दिल्याचा आरोप झाला. याबाबत वसंत देशमुख यांचा निषेध सुजय विखे पाटील यांच्याकडून नोंदविण्यात आला एवढेच नव्हे तर वसंत देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे येथून ताब्यात देखील घेतले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र त्या घटनेनंतर संगमनेर तालुक्यात सुजय विखे यांना गाव बंदी करण्यात आली असल्याची माहिती सोशल मीडियावर टाकण्यात आली. वास्तविक कोणत्याही गावाचा ठरावं मंजूर नसताना! फक्त सोशल मीडियावर सुरु असलेल्या वर्चुअल वॉर मुळे सुजय विखेंना गाव बंदी करण्यात आली असल्याची अफ़वा आता पसरविण्यात आली असल्याची माहिती विखेंच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली असून तसा मॅसेज देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे.
खरंतर वसंत देशमुख यांचा निषेधच मात्र ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या गेल्या त्यावेळी माझ्यावर देखील हल्ला करण्याचा कट रचण्यात आला असल्याची माहिती सुजय विखेंनीं दिली आहे. एवढेच नव्हे तर अपशब्द वापरणाऱ्या वसंत देशमुख यांना थांबविण्यात आल्यानंतर देखील ते बोलत असल्याने हे आमच्या विरुद्ध रचण्यात आलेले षडयंत्र तर नाही ना याची देखील चौकशी करण्याची मागणी सुजय विखे पाटील यांनी केली आहे. सुजय विखे यांनी केलेल्या मागणीनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात देशमुख यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. मात्र सोशल मीडियावर आभासी वॉर करत गाव बंदीच्या पसरविण्यात येणाऱ्या अफ़वांवर कोणीही विश्वास ठेवू नये कोणत्याही प्रकारची गाव बंदी कुणीही केली नसल्याची माहिती आता विखे समर्थकांकडून देण्यात आली आहे…