महाविकास आघाडीच्या ‘त्या’ नेत्यांच्या वक्तव्याला लोक फारसं गगंभीर्याने घेत नाही ; जगतापांचा निशाणा…
अहिल्यानगर :- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी नगर शहर मतदार संघात सुरु झाली आहे. महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे महावीकास आघाडीच्या नाट्यमय घडामोडी नंतर प्रचारास सुरुवात झाली. दरम्यान नगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा आम्ही जिंकू असा विश्वास या प्रचारा दरम्यान महाविकास आघाडीचे खासदार आणि उमेदवार यांनी व्यक्त केला. मात्र नगरचे लोक त्यांच्या वक्तव्याला फारसं गंभीर्याने घेत नसल्याची टीका महायुतीचे उमेदवार तथा आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.
खरंतर नगर शहर मतदारसंघात संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर विरुद्ध शशिकांत गाडे असा सामना रंगणार आहे. शशिकांत गाडे यांनी शिवसेनेकडून बंड करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर गाडे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठींबा दिला मात्र त्यांनी पाठींबा दिला असला तरी त्यांचा अर्ज दाखल असल्याने ते देखील या निवडणुकीच्या रिंगणात ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खरंच काही अलबेल आहे असं वाटत नाही?
निवडणुकीपूर्वी नगर मतदारसंघातून आघाडीच्या तिन्ही पक्षातून अनेकजण इच्छुक होते एवढेच नव्हे तर आम्ही सर्व एकत्र असून ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार आम्ही करणार असल्याची कबुली आघाडीच्या नेत्यांकडून दिली गेली होती. असं असतांना उमेदवारी शरद पवारांच्या गोट्यात जाताच बंडाच हत्यार उपसण्यात आला आणि तेथेच महावीकास आघाडीची बिघाडी चव्हाट्यावर आली?आता मात्र सगळे एकत्र दिसत असले तरी आघाडीत घडलेल्या नाट्यमय घडमोडी नंतर खरंच आघाडीतील “त्या” नेत्यांच्या वक्तव्याला लोक गांभीर्याने घेणार का हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे…