Uncategorized

टायगर अभि जिंदा है ; मतदारांनी वाढदिवसाचे गिफ्ट देत सुजय विखेंना ठरविले “किंगमेकर”

अहिल्यानगर :- भाजपाचे नेते सुजय विखे पाटील यांचा आज वाढदिवस असून विखेंना मतदारांनी वाढदिवसाचे गिफ्ट देत जिल्ह्याचा किंगमेकर ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीत निलेश लंकेना काँग्रेसेचे नेते बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, यांच्यासह अनेकांनी मदत करत सुजय विखे यांचा पराभव करण्यासाठी मदत केली होती. आणि त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सुजय विखे यांनी वडील राधाकृष्ण विखे यांच्या मतदार संघासह जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर, नेवासा, राहूरी आणि इतर मतदार संघात लक्ष केंद्रित करत विधानसभेला पुरेपूर बदला घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या सभा आणि प्रचाराला मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत सुजय विखेंना किंगमेकरचं पद हे त्यांच्या वाढदिवसाचे गिफ्टचं दिले आहे…

लोकसभेला पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी न थांबता जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांच्या मतदार संघात घुसून प्रचार केला, एक ना अनेक सभा घेतल्या विखेंच्या सभेला नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. आणि नगर जिल्ह्यात थोरात, तनपुरे, गडाख, पिचड, या घराण्यातील उमेदवारांना मतदारांनी नाकारून त्यांच्या राजकारणाला ब्रेक लावला. तर नव्याने तयार होणारी लंके यांची घराणेशाही सुद्धा थांबविली. तर दुसरीकडे काळे – कोल्हे संघर्ष थांबल्याचे भरभरून स्वागतही केले आणि सुजय विखे पाटील यांची आणखीन ताकद वाढवून त्यांना जिल्ह्याचे किंगमेकर केले हे मात्र नक्की.

जिल्ह्यात एकूण १२ मतदार संघ या बारा पैकी दोन मतदारसंघ वगळले तर १० मतदार संघात मतदारांनी महायुतीला कौल दिल्याने खुद्द सुजय विखेंनी जनतेचे आभार मानत अनेकांना गाडलं असल्याची प्रतिक्रिया दिली.लोकसभेचा बदला घेण्यासाठी जिल्ह्याच्या रिंगणात उतरलेल्या सुजय विखेंनी सुरवातीला “टायगर जिंदा” है म्हणत कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये एक उत्साह आणि नवंचैतन्य निर्माण केलं. वडील राधाकृष्ण विखे यांच्या विजयाचा भागीदार होतांना नगर लोकसभेत झालेल्या पराभावाचा कलंक पुसून काढत टायगर जिंदा है या दाव्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले. वडिलांचा विजय खेचून आणत त्यांनी संगमनेर मध्ये रान पेटवलं. बाळासाहेब थोरात यांच्या समोर एक नवखा उमेदवार देऊन त्यांना चितपट केलं आणि जनतेचे आभार मानले.

जनतेचे आभार मानत सुजय विखेंनी अनेकांवर टीका केली. संगमनेर मध्ये बोलतांना शांतचित्ताने बसून पारनेर वाल्याला कसं गाडायचं ते गाडलं तर ज्यो ज्याच्या जीवावर उड्या मारत होता त्या संगमनेर वाल्यालाही गाडलं. एवढंच नव्हे तर राहूरी वाल्यांना लोकसभेला खूप पुळका आला होता त्यांना सांगितलं होत नाद करू नका. तेथे देखील त्यांना पस्तीस हजारांनी गाडून टाकलं आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला संपविण्याचा प्रयत्न केला त्यांना आज घरचा रस्ता जनतेने दाखविला असल्याची प्रतिक्रिया सुजय विखेंनी दिली आहे. दरम्यान सुजय विखेंनी टायगर जिंदा है या दाव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
× How can I help you?