अहमदनगर – संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको प्रकरणी 47 आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल..!
अहमदनगर – नगर जिल्ह्यातील असलेल्या रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराजांवर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नगर संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको करणाऱ्या 47 आंदोलकांवर देखील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम धर्माबद्दल अपशब्द वापरल्याचा महाराजांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अहमदनगर जिल्हा सह ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले. परिणामी अहमदनगर शहरासह पुणे, वैजापूर,संगमनेर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रामगिरी महाराजांवर धार्मिक भावना दुखावण्याचा त्याचप्रमाणे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान नगर शहरात शुक्रवारी दुपारी नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम समुदायातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी कोणतीही परवानगी नसताना नगर संभाजीनगर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी नगर संभाजीनगर महामार्गावरती दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अखेर कार पोलिसांनी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले मात्र कोणतीही परवानगी नसताना रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे 47 आंदोलनकर्त्यांवर तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे…..