HealthUncategorized

शिर्डीत सहलीसाठी आलेल्या शाळेकरी मुलांना फुड पॉइज़नीगचा त्रास ! तब्बल शंभर मुल रुग्णालयात दाखल

Shirdi – अमरावती हून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या तब्बल शंभर विद्यार्थांना फुड पॉइज़निंग झाल्याची घटना समोर आलीये. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथिल आदर्श हायस्कूल येथिल हे विद्यार्थी असून दोन दिवसापासून ते सहलीसाठी निघले होते. शिर्डीत येण्यापुर्वी दुपारचे जेवन केले त्यानंतर साई बाबांचे दर्शन घेतले .

मात्र १६ फेब्रुवारीच्या रात्री देवगड येथे मुक्कामी निघले असताना मुलांना उलट्या आणि जुलाब सुरु झाले. यातील काही विद्यार्थांना अधिक त्रास जाणवत असल्यानं शिक्षकांनी सर्व मुलांना रात्री शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील काही मुलांना ताप थंडी सारखे प्रकार देखिल दिसून आल्यानं खबरदारी म्हणून रुग्णालयाने सर्व विद्यार्थांना देखरेखी खाली ठेवलय..

महत्वाच म्हणजे मुलांनी बाहेर कुठे काही खाल्ल नसल्याच शिक्षक सांगताय, जेवन तयार करण्याची सामुग्री सोबतच असल्याच सांगीतल जातय तर पाणी बदला मुळे उलट्या सुरु होवून फूड पॉइज़नींग सारखा प्रकार असल्याचं शिक्षक सांगताय..

मुलांची प्रकृती स्थिर असून सर्व बाधित मुलांना सध्या रुग्णालायत दाखल ठेवले आहे..सहलीत 227 विद्यार्थी असून यातील शंभर मुलांना त्रास झालाय तर काही शिक्षकांना देखिल अन्न विषबाधा सारखी लक्षण जाणवल्यानं त्यांना ही उपचारासाठी दाखल केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
× How can I help you?