Uncategorized
निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीला घातक आहे ; मात्र जनता जे निर्णय देईल ते येणाऱ्या निवडणुकीत दिसेल – बाळासाहेब थोरात
अहमदनगर – निवडणूक आयोगाचा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय लागला असून शिवसेना नाव आणी चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे असं असलं तरी आयोगाच्या या निर्णयाबाबत उद्धव ठाकरेसह आता कॉंग्रेस नेत्यांनीहि भाजप आणी निवडणूक आयोगावर आरोप केले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा लोकशाहीला घातक असा निर्णय आहे मात्र असं जरी असलं तरी येणाऱ्या निवडणुकीत जनता जे निर्णय देईल ते सर्वांना दिसेल अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
स्वायत्तता संस्थेची जबाबदारी निरपेक्ष भावनेने निर्णय देने असते मात्र या स्वायत्तता संस्था मध्ये देखील किती राजकारण झालं आहे हें आजचा उदाहरण आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीच राजकारण करत आहे त्याला जनता खपवून घेणारं नाही असं मतं थोरात यांनी व्यक्त केलं आहे