डॉक्टर मनमोहन सिंहाचा सल्ला स्वीकारत केंद्राने आपली चुक दुरुस्त केली ; रोहित पवारांची केंद्र सरकार बोचरी टीका
अहमदनगर – भारतीय रीजर्व्ह बँकेने चलनातून 2000 दोन हजाराच्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI च्या या निर्णयानंतर शरद पवारांचे नातु तथा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केंद्र सरकारवर बोचरी टिका केली आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंहांचा सल्ला स्वीकारत केंद्र सरकारने आपली चुक दुरुस्त केली असल्याची टिका रोहित पवारांनी केली आहे.
या संदर्भात रोहित पवारांनी आपल्या ट्विटर वर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले कीं केंद्र सरकारने 2016 मध्ये #2000 रुपयांची चलनी नोट छापण्याचा निर्णय घेतला असता ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांनी ‘काळ्या पैशावर वचक आणायचा असल्यास जास्त किंमतीच्या चलनी नोटा छापू नयेत’, असे मत व्यक्त केले होते.
मात्र सर्व अर्थतज्ज्ञांचा सल्ला झुगारून केंद्र सरकारने Rs 2000 ₹ च्या नोटा छापून मोठी चूक केली आणि आज ७ वर्षानंतर अप्रत्यक्षपणे का होईना डॉ. मनमोहनसिंग साहेबांचा सल्ला स्वीकारत केंद्र सरकारने आपली चूक दुरुस्त केली, याबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन! अशी बोचरी टिका रोहित पवारांनी केली आहे.