Dailytimes Network – 2 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतला आहे. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयने केलं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत.
देशात ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर २ हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. तेव्हापासूनच २ हजार रुपयांच्या नोटेबाबत साशंकता व्यक्त केली जात होती अखेर आज रिझर्व्ह बँकेने घोषणा केली की, २ हजार रुपयांच्या नोटा आता चलनात आणू नयेत.
पहा रिझर्व्ह बँकेने काय दिला आदेश
रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिला आहे की, बँकांनी २ हजार रुपयांची नोट ग्राहकांना देऊ नये. ती चलनात आणू नये. येत्या २३ मे पासून २ हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून मिळणार आहेत जास्तीत जास्त २० हजार रुपयांपर्यंतच्या २ हजाराच्या नोटा या बँकेतून बदलून मिळू शकतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. येत्या ३० सप्टेंबर पर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. म्हणजेच, ३० सप्टेंबर पर्यंत २ हजार रुपयांच्या वैध असतील. त्यापुढे त्या अवैध असतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.