CrimHealthPoliticalआर्थिकमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिक

पूजा खेडकरचे नगर कनेक्शन ; अपंगत्व प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर? ते नगरच्या आयकर विभागाचा देखील आला सहभाग? – पहा नेमकं काय आहे नगर कनेक्शन

अहमदनगर – सध्या गल्ली ते दिल्ली पर्यत वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरण गाजत असून पूजा खेडकर प्रकरणात अहमदनगर कनेक्शन उघड झाले आहे. अपंगत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर? ते अहमदनगर आयकर विभागाचा देखील आता यात प्रकरणात सहभाग पहायला मिळत आहे? पूजा दिलीप खेडकर या 2023 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना परीविक्षाधिन ( ट्रेनिंग ) सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली. प्रशिक्षणाच्या काळात त्यांनी प्रशासनाचे कामकाज समजून घेणे आणि इतर गोष्टी शिकणे अपेक्षित होते. मात्र तिथे ऋजू होण्याच्या आधीच त्यांनी अवास्तव मागण्या करणे सुरू केले. त्यांच्या विनंत्या मान्य करुनसुद्धा त्यांनी काही ना काही कारणाने तक्रारी करतच राहिल्या.आणि म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी पूजा खेडकर यांची वरिष्ठकडे तक्रार केली. पूजा खेडकर यांची तक्रार केल्यानंतर पूजा खेडकर आहे तरी कोण याची माहिती वरिष्ठानी घेतली असता खेडकरांच्या प्रमाणपत्रा बाबत शंका उपस्थित करण्यात आली आणि तेथून हे प्रकरण उघड झाले….

पूजा खेडकर यांनी IAS साठी पूणे आणि अहमदनगर रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावील्याचे सुरवातीला उघड झाले होते. त्यानंतर त्यांची एक एक माहिती समोर आल्यानंतर नगर कनेक्शन देखील उघड झाले आहे. खेडकर यांनी 2018 साली अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग अपंगत्वाचा प्रमाणपत्र मिळावीला होता. त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये पून्हा जिल्हा रुग्णालयातून मानसिक आजाराचा प्रमाणपत्र मिळवीला होता. आणि पुन्हा हे दोन्ही प्रमाणपत्र एकत्र करून मार्च 2021 मध्ये एकत्रित प्रमाणपत्र मिळवील्याचे उघड झाले. अहमदनगर मधून प्रमाणपत्र मिळवीला असल्याच उघड होताच अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी याबाबत सर्व कागदपत्र मागविली असून त्याबाबत चौकशी सुरु केली आहे. नगर मधून फक्त प्रमाणपत्र घेतले असल्याचे समोर येताच खेडकर यांचा आणखीन एक खुलासा समोर आला. ते म्हणजे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राचा नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र हे 8 लाखाच्या आत उत्त्पन्न असलेल्यासाठी दिला जातो आणि संबंधित व्यक्ती आरक्षित असल्यास त्याला आरक्षणाचा फायदा होतो. मात्र पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी 2024 लोकसभा निवडणूक ही अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लढविली आणि त्यावेळी त्यांनी दिलेल्या एफिडेविट मध्ये 40 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे दाखविले होते. त्यामुळे पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रा बाबत शंका उपस्थित झाली अनं हे प्रमाणपत्र अहमदनगर मधून दिला आहे का? असेल तर त्याचा अहवाल देखील जिल्हाधिकारी यांनी मागविला आहे. कारण पूजा खेडकर यांनी नाव, पत्ता बदलून अनेक वेळा परीक्षा दिली एवढेच नव्हे तर त्यांनी अहमदनगर सह अन्य ठिकाणाहून देखील अपंगत्वाचा प्रमाणपपत्र घेतलं आहे असं बोललं जातं आहे त्यामुळे आता नॉन क्रिमीलेअर संदर्भात देखील जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहे…upsc सारख्या वर्ग एक च्या अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असतांना खेडकर कुटूंबीयांच्या मालमत्ता विषयी देखील आरोप आणि तक्रारी करण्यात आल्याचे माध्यमातून समोर आले आहे. त्याचं पार्शवभूमीवर अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगरच्या आयकर विभागाला खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या उत्पन्नाबाबत देखील माहिती मागविली आहे. त्याच्या मालमत्ते संदर्भात आरोप होतं असतांना आणि खुद्द दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत सादर केलेल्या एफेडेविड मध्ये चाळीस कोटीची? मालमत्ता दाखवील्याने जिल्हाधिकारी यांनी आयकर विभागाकडून माहिती मागविली आहे. त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणाचे अहमदनगर कनेक्शन असल्याचे देखील उघड झाले असून खेडकर कुटूंबायांच्या अडचणीत आणखीन वाढ़ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
× How can I help you?