अहमदनगर – अहमदनगर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी आता नव्याने यशवंत डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अहमदनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यशासनाने अहमदनगर महानगर पालिकेच्या आयुक्त पदी देविदास पवार यांची नियुक्ती केली होती. मात्र आता पून्हा राज्यशासनाने नव्याने आदेश काढून महापालिकेच्या आयुक्त पदी यशवंत डांगे यांची नव्याने नियुक्ती केली आहे.
आयुक्त पंकज जावळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर 8 जुलै रोजी शासनाने पवार यांची नियुक्ती केली मात्र आता पुन्हा दोनच दिवसांत शासनाने आपला निर्णय बदलला असून पवार यांच्या जागी यशवंत डांगे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नव्याने शासन निर्णयानुसार येणारे आयुक्त डांगे हे महापालिकेचा कारभार कश्या पद्धतीने हातळणार हे येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वच ठरणार आहे..!