कोतवाली पोलिसांची सिने स्टाईल कारवाई ; मात्र कत्तलीसाठी येणाऱ्या जनावरांचे मूळ मालक कोण?
अहमदनगर – सुप्याकडून नगरच्या दिशेने कत्तलीसाठी चावलेल्या ३२ वासरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली आहे. विशेष म्हणजे सिने स्टाईल कत्तलखोरांच्या गाडीचा पाठलाग करत ही कारवाई करण्यात आली आहे. कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गोवंशिय जाणवरांची गाडी अडवून कारवाई करण्यासाठी थांबलेल्या कोतवाली पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न या कारवाई दरम्यान करण्यात आला. सुप्याकडून नगरच्या दिशेने येणारी ही गाडी केडगाव जवळ आली असता तेथे पोलिसांना बघताच पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी देखील पाठलाग करत झेंडीगेट परिसरात गाडी अडवून कारवाई केली.
आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांच्या मदतीला आलेल्या व्यक्तीवर गाडीच्या खिडकीतून धारदार शस्त्राने हल्ला देखील करण्यात आला असल्याचे बोलले जातं आहे. दरम्यान पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत चारही आरोपीना बेड्या ठोकल्या आहे. यामध्ये पोलिसांनी चौघे काळे बंधूना अटक केली आहे.
पोलिसांनी केलेली ही सिने स्टाईल कारवाई खरंच कौतुकास्पद असली तरी शहरामध्ये कत्तलीसाठी आणण्यात आलेले हे जनावरे कुणाचे होते हे अद्याप गुलदस्त्यात आहे? सुप्याकडून अहमदनगर शहरात वासरांनी भरून आणण्यात आलेली गाडी कोणत्या खाटकाकडे चालली होती याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे. नगर मध्ये येणारी गाडी आणि आत्तापर्यंत शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाया हे “त्या” मोहल्ला परिसरात केलेल्या आहेत त्यामुळे सुप्याकडून येणारी गाडी कोणत्या मोहल्यात जाणार होती? काळे नामक आरोपी त्या वासरांना कोणाच्या ताब्यात देणार होते? पोलिसांनी ज्या ठिकाणी गाडी अडवली हे आरोपी देखील त्याच मोहल्याच्या परिसरात कसे थांबले असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून पोलिसांनी याची कसून चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान बाहेरून येत असलेल्या जनावरांच्या गाड्यावर कारवाई होत असली तरी नगर शहरात हे गाड्या कोणाच्या सांगण्यावरून व कुठे येतात या संदर्भात ठोस कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिकांमधून व्यक्त केली जातं आहे….!