Crimमहाराष्ट्रशहर
अहमदनगर मध्ये मुबंई नार्कोटेस्ट पथकाची कारवाई ; पुण्याकडे चालेल्या आरोपींना ठोकल्या बेड्या ; लाखोंचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील नगर पाथर्डी महामार्गांवर मुबंई नार्कोटेस्ट पथकाने गांजाची अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या आरोपीना बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी 125 किलो गांज्यासह 25 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अहमदनगर – पाथर्डी मार्गे हा गांजा पुण्याकडे जातं आहे अशी माहिती मुबंई नार्कोटेस्ट पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला होता. मात्र मुबंई पोलिसांनी आपल्या भोंवती जाळ लावल्याची कुणकुण आरोपीना लागताच आरोपीनी करंजी परिसरातील दगडवाडी भागात गाड्या घातल्या त्याचंवेळी सिने स्टाईल आरोपीचा पाठलाग करत असलेल्या मुबंई नार्कोटेस्ट पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 125 किलो गांज्यासह दोन चारचाकी गाडी असा एकूण 25 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती मिळाली आहे….
शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात देखील आज सकाळपासून पोलिसांनी अवैध रित्या गांजा, ड्रग्स प्रकरणी धाडसत्र सुरु केल्या आहे. पुण्यातील एका नामांकित हॉटेल मध्ये ड्रग्स विक्री होत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आमलीपदार्थ विकणाऱ्यांचे पोलिसांनी धाबे दानाणून सोडले आहे. दरम्यान एकीकडे पुण्यामध्ये अवैध आमली पदार्थ विरोधात धडक कारवाई सुरु असून दुसरीकडे अहमदनगर मध्ये चक्क मुबंई पोलिसांनीचं कारवाई केली आहे. मुबंई नार्कोटेस्ट पथकाच्या या कारवाई मुळे जिल्ह्यातील आमली पदार्थ विकणाऱ्यांचे चांगलेचं धाबे दणणाले आहे….