अहमदनगरचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपिठात जनहित याचिका दाखल ; 25 जुलैला होणार पहिली सुनावणी
अहमदनगर – अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुबंई उच्चं न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख व पुष्कर सोहोनी यांनी ही याचिका दाखल केली असून याची पहिली सुनावणी ही २५ जुलै रोजी होणार आहे..!
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर नावाची घोषणा केली होती त्यानंतर राज्य सरकारने अहमदनगर महापालिकेचा ठराव मागविला होता. दरम्यान अहमदनगर महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपल्याने महापालिकेवर प्रशासक असलेले आयुक्त पंकज जावळे यांनी अहमदनगरचे अहिल्यानगर करण्यास कोणतीही अडचण नसल्याचा ठरावं पाठवला होता. आणि त्यामुळे राज्यसरकारने मंत्रिमंडळात अहिल्यानगर नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. राज्य सरकारने जरी प्रस्तावाला मान्यता दिली असली तरी हे प्रकरण अद्यापही केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे…..
अहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे. आणि या जिल्ह्याला अहमद निजामशाह याने स्वतः आपल्या हाताने वसवले असून अहमदनगर शहराचा वाढदिवस देखील आपण साजरा करत असतो. आणि त्यामुळे इतिहास पुसला जातं नसून इतिहास बनविला जात असल्याने सरकारने अहमदनगर शहराजवळच एक नवीन अहिल्यानगर उभाराव जेणे करून शहराचा इतिहास अबाधित राहील अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते माजी कुलगुरू सर्जेराव निमसे सर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे शहराचे नाव बदलण्याच्या कायद्यातच ज्या शहराचा जिल्ह्याचा इतिहास आहे अश्या शहराचे आणि जिल्ह्याचे नाव बदलू नये असा सरकारचाच कायदा सांगतोय मग अहमदनगर शहराला अनेक वर्षांपासूनचा इतिहास आहे. त्यामुळे सरकारने अहमदनगरचे नामंतर करू नये यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती निमसे सर यांनी दिली आहे. दरम्यान आता या प्रकरणाबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे..!