दिव्यांग बोगस प्रमाणपत्रा नंतर आता बोगस बांधकाम परवाना तसेच बनावट शिक्क्यांचा घोटाळा? अर्ज करून देखील भिंगार पोलिसांकडून चौकशी करण्यास टाळाटाळ?
अहमदनगर – अहमदनगर शहरातील नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयाला तब्बल आठ महिन्यापूर्वी बनावट ग्रामपंचायतचे बांधकाम परवाना प्रमाणपत्र तसेच बनावट शिक्क्यां संदर्भात चौकशी करण्याची मागणी नागरदेवळे ग्रामपंचायतिने केली होती या मागणीला आठ महिने उलटले तरी पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.
नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आलमगीर या परिसरामधील सर्व्ह नंबर २४२/१ मधील प्लॉट नंबर ५ व ६ मध्ये संबंधितांच्या नावाने ग्रामपंचायत कार्यलयात कुठल्याही प्रकारची मिळकत नोंद नाही तसेच २०२१ – २०२२ च्या जावक रजिस्टर मध्ये जावक क्रमांक ७८७६ यावर देखील कुठल्याही प्रकारची जावक नोंद आढळून येत नाही तसेच सर्व्हे नंबर ७०५०/२१ यावर देखील कुठल्याही प्रकारची बांधकाम परवानगी दिलेली नसताना देखील बनावट बांधकाम परवाना, बनावट शिक्के आणि बनावट जावक क्रमांक टाकण्यात आल्याचे ग्रामपंचायत नागरदेवळे यांच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले होते. त्यानुसार नागरदेवळे ग्रामपंचायतिने संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी या मागणीचे अर्ज पोलीस अधीक्षक कार्यलायाला 2 /12/2023 मध्ये चौकशी करण्याचे पत्र दिले होते.. मात्र पोलीस अधीक्षक असो अन्यथा भिंगार कँम्प पोलीस ठाणे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल मागील आठ महिन्यात घेण्यात आली नाही.
त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच भिंगार पोलीस ठाणे हे संबंधित बनावट प्रमाणपत्र तसेच बनावट शिक्के बनवणाऱ्या टोळीला पाठीशी तर घालत नाही ना? हाच प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे गेल्या आठ महिन्यापासून कार्यवाही होत नसल्याने या प्रकरणामधील मुख्य अर्जदार यांनी जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र नागरदेवळे ग्रामपंचायतीने याबाबत कार्यवाही सूरु असल्याची माहिती दिली होती. वास्तविक पाहता गेल्या आठ महिन्यापासून या प्रकरणी भिंगार कॅप पोलिसांकडून कुठल्याही प्रकराची चौकशी करण्यात आली नसल्याने या बनावट शिक्के तसेच परवाना प्रमाणपत्रा प्रकरणाचा जणू आर्थिक वास सुटला आहे? त्यामुळे गेल्या आठ महिन्यापासून दिलेल्या अर्जाची न करण्यात आलेली चौकशी लवकरात लवकर करण्याची अपेक्षाच आता नागरदेवळा ग्रामपंचायत कार्यालयाकडून होत आहे..?