अहमदनगर – अहमदनगर शहरात लोकसभा निवडणुका संपल्यानंतर महापालिका निवडणुका होतील अशी अनेकांना अपेक्षा आहे. मात्र महापालिका निवडणुकीचा सस्पेन्स कायम असतांनाच शहरातील अनेक प्रभागासह मुकुंदनगर मध्ये देखील अनेकांना नगरसेवक पदाचे डोहाळे लागले आहे. निवडणुका कधी पार पडणार याचा थांग पत्ता देखील नाही मात्र एक ना अनेक गुडग्याला बांशिग बांधून तयार झाले आहे. दररोज वाढदिवस, गाठीभेटी फेसबुक, इन्स्टाग्रामसह व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावर दिवस भर केलेल्या कामांचा अनेक जण स्वतःच कौतुक करतांना दिसत आहे…
महानगर पालिकेचा कार्यकाळ पूर्ण होऊन अनेक महिने उलटले त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जिल्हा परीषदा, नगरपालिकांच्या निवडणूकीला देखील तब्बल दोन दोन वर्ष पूर्ण झाली आहे. एवढेच नव्हे तर मुबंई पुण्यासारख्या शहरात गेल्या 5-5 वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे महापालिकां निवडणुकीचा सस्पेन्स कायम असला तरी एक ना अनेक जण गुडग्याला बाशिंग बांधून तयार झाले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बूथ निहाय मतांची मोजणी “उभ्या” राहिलेल्या उमेदवारांनी देखील केली नसेल तेवढ्या मतांची गणित आत्ता पासूनच प्रभाग निहाय लावली जातं आहे..
गेल्या निवडणुका प्रभाग पद्धतीने झाल्या होत्या.यावेळी महापालिकेच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने होणार की वार्ड निहाय होणार हे देखील अद्याप सस्पेन्स आहे. प्रभाग पद्धतीने निवडणुका असल्यास उमेदवारराची दमछाक होते तर वार्ड निहाय निवडणुका असल्यास तेवढे बळ लागत नाही त्यामुळे निवडणुका प्रमाणेच प्रभाग की वार्ड याचं देखील सस्पेन्स कायम असतांना पडक्या भिंतीवर , चौकतल्या लाईटपोलवर, एखाद्याच्या दुकानावर भले मोठे फ्लेक्स लावून स्वतःची जाहिरात करतांना अनेक इच्छुक दिसून येत आहे…
इच्छुकांचे कार्यकर्ते देखील तेवढेच उत्साही. एखादा नेता, खासदार, आमदार संबंधित प्रभागात आला की लगेच पांढरे किंवा नवीन कपडे घालून तयार असलेल्या आपल्या मेंबरचे फोटो शूटिंग काढण्याला कार्यकर्ते महत्तव देत आहे.. फोटो आणि शूटिंग एखाद्या नेत्यासोबत काढताच कार्यकर्ता लगेचच इच्छुक मेंबरचा फोटो सोशल मीडियावर पाठवून समस्येच निराकरण करतांना दाखवीत आहे… असो असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून लांबनीवर पडलेल्या महापालिकेच्या निवडणुका आणखीन पुढे ढकलले गेल्यास तयारीला लागलेल्यांच स्वप्नं भंग होऊ नये हीच अपेक्षा….!