बेकरी कामगार हल्ला प्रकरणात तीन अटकेत मात्र कारण गुलदसत्यात ; रॅली नंतर झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण?
अहमदनगर – अहमदनगर शहरात गेल्या चार दिवसापूर्वी रामवाडी येथे किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला होता. किरकोळ वाद झाल्यानंतर शहरासह उपनगरात रात्रीच्यावेळी १० ते १५ जणांनी शहरात दहशत माजवीत प्रतिबंधत्मक आदेशाचे उल्लंघन केले होते. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात पहिला १५१ (३)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कुणाल भंडारीसह आणखीन दोघांना अटक केली होती…..!
तर त्याचं दिवशी रात्री उपनगरातील बेकरी मध्ये काम करणाऱ्या कामगारांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. गाढ झोपेत असलेल्या कामगारांना काही हल्लेखोरांनी टार्गेट केले. त्यामुळे दुसरा गुन्हा देखील त्याच रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.. त्यामध्ये अज्ञात युवकांनी हल्ला केल्याचा उल्लेख असून पोलीस या हल्ल्याचा तपास करत असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे…
कुणाल भंडारी याला जामीन मंजूर
तोफखाना पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर पहिल्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या कुणाल भंडारी याला पोलिसांनी कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला.. मात्र विशिष्ठ समाजाने पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात देखील कुणाल भंडारी याच्या चौकशीची मागणी केली होती…परंतु दुसऱ्या गुन्ह्यात कुणाल भंडारी याचा कोणताही पुरावा नसल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. त्यामुळे त्याला पहिल्या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर सोडून देण्यात आले…
कामगार हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक कारण मात्र गुलदस्त्यात?
१८ जून रोजी शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने निघालेल्या रॅलीच्या दाखल गुन्ह्यानंतर उपनगरात बेकरीतील कामगार मारहाण प्रकरणी पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये जयेश लसगरे,सोमनाथ शिंदे आणि आकाश पवार या तींघाचा समावेश आहे. मात्र हल्ल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये ८ ते १० जणांची टोळी हल्ला करतांना दिसत असल्याने फरार आरोपीचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती देण्यात आली. असं असलं तरी क्रूर पद्धतीने करण्यात आलेल्या हल्ल्यामागे नेमका कारण काय हे अद्यापही उघड झालेल नाही. कोणत्या कारणाने हा भ्याड हल्ला करण्यात आला याबाबत पोलीस तपास करत आहे…
दहशत माजविण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅली नंतर झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण?
शहरात निघालेल्या रॅलीत धिंगाणा आणि त्यानंतर हल्ला दोन्ही घडलेले गुन्हे हे एकापाठोपाठ एक आहे. विशेष म्हणजे शहरात दहशत माजविण्यासाठी हातात काठ्या घेऊन शहर परिसर ते उपनगरा पर्यत निघणारी रॅली ही दुसरा गुन्हा म्हणजेचं बेकरी कामगारांवर झालेल्या हल्ल्याचं निमित्त तर नाही ना? दहशत माजवण्यासाठी रॅली काढल्यानंतर काही वेळाने कामगारांवर हल्ला झाला हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरून तर करण्यात आला नाही ना? हल्ल्याच्या cctv मध्ये दिसणारे युवक आणि रॅलीतील दाखल गुन्ह्यातील युवकांचा घडलेल्या घटने दरम्यान हल्ल्यासंदर्भात मोबाईलवर काही संभाषण तर झाले नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून. या हल्ल्यामागे नेमका मुख्य सूत्रधार आहे तरी कोण याचा तपास करून संबंधित मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे…