तिघा आरोपींसह लाखोंच्या 10 दुचाकी वाहन हस्तगत ; दुचाकीत बुलेट वाहनांचा समावेश ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दुचाकी चोराबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात चोरी गेलेल्या दुचाकी संदर्भात माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून 3 दुचाकी चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 दुचाकी हस्तग करण्यात आल्या असून त्यामध्ये 5 बुलेट दुचाकी वाहनांचा देखील समावेश आहे.
आज जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल आल्हाट हा दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी अनिल आल्हाट यांस अटक करून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचे साथीदार हर्षद ताम्हाणे आणि निखिल घोडके या तिघांनी मिळून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक करून 12 लाख रुपयांच्या तब्ब्ल 10 दुचाक्या हस्तगत केल्या आहे