अहमदनगरच्या वाळकी मध्ये मोठ्या संख्येने तयार करण्यात आलेल्या आव्हाड्यांच्या प्रतिमेला जोडे मारत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचे आंदोलन
अहमदनगर – शरदचंद्र पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केलेल्या आंदोलनादरम्यान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्यानंतर, राज्यभरातून आव्हाड यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे, दरम्यान अहमदनगर तालुक्यातील वाळकी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या मोठ्या संख्येने तयार करण्यात आलेल्या प्रतिमेस जोडे मारून धिंड काढण्यात आली, भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलना दरम्यान मोठ्या संख्येने जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर तयार करून वाळकी गावातून त्या पोस्टरला जोडे मारत धिंड काढून आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्यासह शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भलसिंग यांनी जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. खरंतर आव्हाड यांनी केलेली ही नौटंकी केवळ प्रसिद्धी साठी केलेली आहे. मात्र प्रकाशजोतात येण्यासाठी त्यांनी चक्क महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली खरंतर आव्हाड यांच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी जेणे करून कोणी दुसरा व्यक्ती अश्या प्रकारे महामानवाच्या प्रतिमेची विटंबना करणार नाही अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष दिलीप भालसीग यांनी दिली आहे…