तुम्हांला मुस्लीम मते चालतात मात्र मुस्लीम नेतृत्व नको ; शरद पवार, राहुल गांधी हेच का – इम्तियाज जलीलचा MVA वर निशाणा
अहमदनगर – AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी महावीकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीला मुस्लीम मते चालतात मंग मुस्लीम नेतृत्व का नाही असा खोचक टोला खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.
आज देशात भाजपा विरोधात सगळे विरोधी पक्ष आणी पार्ट्या एक होतं असतांना महाराष्ट्रात मात्र AIMIM महाविकास आघाडी सोबत का नाही असा प्रश्न जलील यांना विचारताच त्यांनी चक्क आघाडीलाच लक्ष्य केले त्यांनी सांगितले कीं आम्ही महाविकास आघाडी सोबत जायला तयार आहे मात्र ते आम्हांला घेत नाही त्यांनी आजही आम्हांला ऑफर द्यावी आम्ही जाऊ मात्र महाविकास आघाडी आता तरी त्यांची दुप्पटी भूमिका बंद करावी
एकीकडे त्यांना मुस्लीम मते चालतात मात्र त्यांना मुस्लीम नेतृत्व नको आहे. आज त्यांना फ़क्त शरद पवार आणी राहुल गांधी पाहिजे, महाविकास आम्हांला भाजपाची B टीम म्हणून संबोधित करते मात्र जर आम्हांला बघायचे असेल तर एक वेळा आम्हांला स्वतःला सिध्द तर करू द्या. आम्ही सिध्द करून दाखवू शकतो मात्र तुम्ही ऑफर देत नसल्यामुळे आज आम्ही महाविकास आघाडी सोबत नसल्याची प्रतिक्रिया AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
वास्तविक पाहता सध्या देशामध्ये भाजपाला घेरण्यासाठी देशातील सर्वच विरोधी पक्ष आणी पार्ट्या एकत्र येतं आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे आणी शरद पवारांची भेट घेतली होती त्यामुळे देशाच्या राजकारणात सर्व विरोधी एकत्र येतं असल्याने तसाच फॉर्म्युला भाजपा विरोधात महाराष्ट्रात देखील होने अपेक्षित आहे. आणी म्हणूनच AIMIM ने देखील महाराष्ट्रात महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी तयारी दर्शविली आहे