6 लाखांचा गुटखा रंगेहाथ पकडला ; DAILY TIMES च्या बातम्यांची मोहीम अनं स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
Umer Sayyed
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) 6 लाखांचा गुटखा रंगेहाथ पकडला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत एका टैम्पो मध्ये हिरा, रॉयल तंबाखू, राजनीवास, प्रिमियम एक्स्ल एल,असे एक ना अनेक प्रतिबंधीत गुटखा व पान मसाला पोलिसांनी जप्त केला आहे.
टेम्पो भरून गुटख्याचि वाहतूक होतं असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार पोलिसांनी कोपरगाव येथे सापळा लावला होता. मात्र या सापळ्याची कुणकुण आरोपीला लागताच आरोपीने गुटख्याने भरलेला टेम्पो सोडून धूम ठोकली. दरम्यान पोलिसांनी तब्बल 6 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वास्तविक पाहता अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याचि साठवणूक करून विक्री करण्यात येतं असल्याचे बोलले जात आहे. त्यानूसार DAILY TIMES ने गेल्या 11 वर्षांपासून बंदी असलेल्या गुटख्या संदर्भात बातम्यांची मोहीम सुरू केली आहे. राज्यात गेल्या 11 वर्षांपासून गुटखा बंदी असतांना देखील करण्यात आलेली बंदी हि अयशस्वी बंदी असल्याचे चित्र आहे. मात्र असं असले तरी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने देखील या अवैध गुटखा माफियांकड़े आपल्या कारवाईचा मोर्चा वळविला असून चांगलीच कंबर कसल्याचे दिसत आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात गुटखा माफियांवर फ़क्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कारवाई करत आहे. मात्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत LCB ची कारवाई होतं असतांना देखील संबंधित स्थानिक पोलीस ठाण्याला गुटख्या माफियांची माहिती नाही हें विशेषच म्हणावे लागेल..
खरंतर तर अहमदनगर जिल्ह्यासह अहमदनगर शहरात देखील गुटखा माफियांचे मोठ मोठे डिलर काम करत असल्याच बोलले जात आहे. मात्र शहरातील स्थानिक पोलीस ठाणे मात्र गुटखा माफियांना पाठीशी घालत तर नाही ना ? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतं आहे. त्यामुळे आता तरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका प्रमाणे शहरातील संबंधित पोलीस ठाण्याने देखील कारवाई करावी अशी मागणी अहमदनगर शहराच्या सुज्ञ नागरिकांकडुन होतं आहे…