सुजय विखे पाटील यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ; अशोक चव्हाण पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता भाजपाच्या वाटेवर..?
अहमदनगर – लोणावळा येथे पार पडलेल्या काँग्रेस कमिटीच्या मेळाव्या दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली होती. 2004 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा काँग्रेसमध्ये येत होते त्याचवेळी मी वरिष्ठांना यांना पुन्हा न घेण्याचा सल्ला दिला होता मात्र त्यावेळी कोणी ऐकले नाही. असं सांगत विखे पाटलांवर थोरात यांनी टीका केली होती त्यावर भाजपाचे खासदार सुजय विखे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी बाळासाहेब थोरात बद्दलच सूचक वक्तव्य केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणा मध्ये एकच खळबळ उडाली आहे
भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं की बाळासाहेब थोरात भाजपात येतात असं माझ्या कानावर आल आहे याची शहानिशा नक्कीच करावी.. त्याचं कारण म्हणजे मागच्या एक महिन्यात जेवढे कार्यक्रम झाले त्यामध्ये कोणत्या एकाही कार्यक्रमावर राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांचे फोटो दिसले नाही त्यामुळे वरचे नेत्यांचे फोटो गायब का झाले? याला दोनच कारण असू शकतात माणूस एक तर दुसरीकडे जातोय किंवा त्यांचे फोटो टाकून ते पडतील अशी त्यांची भीती असेल असा टोला सुजय विखे पाटील यांनी लगावला…
भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात बद्दल केलेल्या सूचक वक्तव्यामुळे अहमदनगर जिल्हा सह महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मातब्बर पदाधिकारी व नेत्यांनी देखील काँग्रेसला सोडचिट्टी दिली त्यामुळे सुजय विखे पाटील यांनी केलेल्या विधानामुळे बाळासाहेब थोरात खरंच भाजपाच्या वाटेवर आहेत का? हाच प्रश्न आता उपस्थित झाला असून विखेंच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे…