अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्यांचे पत्नी तसेच काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे च्या दाम्पत्यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आज पुणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे
काँग्रेसला रामराम ठोकत नागवडे दाम्पत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाल्याने अहमदनगर काँग्रेस पक्षासह पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे हे मातब्बर नेते मानले जात आहे अशातच नागवडे दाम्पत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने येणाऱ्या विधानसभेचे निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते त्यांना नागवडे दाम्पत्य हे टेन्शन ठरणार आहे?
श्रीगोंद्यात विधानसभेची जागा हे भाजपाच्या वाट्याला आहे मात्र अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपासोबत सत्तेत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला आपल्या वाटेच्या काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावे लागणार आहेत आणि त्यामुळे श्रीगोंद्यातील नागवडे दाम्पत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्याने बबनराव पाचपुते यांचे टेन्शन वाढणार हे मात्र नक्की?