मंदिर चोरीतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला LCB ने ठोकल्या बेड्या ; 8 मंदिरांच्या दानपेट्या फोडल्याचे निष्पन्न ; टोळीवर तब्बल 31 गुन्हे दाखल
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 8 मंदिरांच्या दानपेट्या फोडणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. जिल्ह्यातील राहुरी, कोपरगाव, श्रीरामपुर, जालना, व भिंगार अश्या वेगवेगळ्या तालुक्यात मंदिरातील दाणपेट्या फोडल्यचे तपासात निष्पन्न झालें आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील रेणुका माता मंदिराचे दरवाजाचे कुलूप तोडून देवीच्या अंगावरील 16 लाख 76 हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरीस गेले होते. या संदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. दरम्यान जिल्ह्यातील मंदिरांच्या दानपेट्या फोडणारि सराईत टोळी हि अहमदनगर सोलापूर रोडवरील बंद पडलेल्या टोलनाक्यांवर येणारं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार टोलनाक्याजवळ पोलिसांनी सापळा लावला होता.
लावलेल्या सापळा ठिकाणी आरोपी धनंजय काळे, भगवान परदेशी, अमोल पारे, राहुल लोदवाल हें आले असता त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात तब्बल 8 मंदिरात चोरी केल्याचे निष्पन्न झालें आहे. त्यांच्याकडुन पोलिसांनी रोख रक्कम साठ हजार रुपये व दान पेटी फोडण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
खरंतर मंदिरांची देवीच्या अंगावरील दागिने असों किंवा दानपेटी असों हें पाप असल्याचे माहिती असतांना देखील या आरोपींनि फ़क्त 8 ठिकाणीच नव्हे तर याआधी देखील अनेक ठिकाणी मंदिरातील दान पेट्या फोडल्याचे समोर आले आहे. यामध्ये आरोपी प्रकाश काळे याच्यावर 8 तर अमोल पारे याच्यावर तब्बल 14 गुन्हे दाखल असून चौघां आरोपींवर तब्बल 31 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.