OBC नेते छगन भुजबळ यांनी दिला आपल्या मंत्री पदाचा राजीनामा ; अहमदनगरच्या सभेमधून केला धक्कादायक गौप्यस्फ़ोट
अहमदनगर – ओबीसी समाज विरुद्ध मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवरून सुरू झालेल्या न्याय अन्यायच्या वादामध्ये ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी होत असलेल्या आरोपाच्या विरोधात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी धक्कादायक गौप्यस्फ़ोट केला आहे
16 नोव्हेंबरलाच अन्य व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरूनच तब्बल दोन महिने मी शांत होतो. मात्र आमच्या सत्तेतले तसेच विरोधातील विरोधक माझ्या राजीनामाची मागणी करत असल्याने आज मीच त्यांना उत्तर देतो की 16 नोव्हेंबरला मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे असा धक्कादायक खुलासा छगन भुजबळ यांनी केला आहे
गेल्या अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणावरून मराठा विरुद्ध OBC असा न्याय अन्यायचा वाद सुरु आहे अश्यातच OBC नेते म्हणून छगन भुजबळ यांनी OBC आरक्षणा मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध दर्शवला आहे.
दरम्यान राज्य सरकारने देखील मराठा समाजाला वेगळे आरक्षण न देता कुणबी म्हणून OBC मधूनच आरक्षण देत असल्याने छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर देखील टिकेची झोड उठवली होती. आणि त्यामुळे सत्तेत असून देखील सत्ताधारी सरकार वर टीका होत असल्याने सत्तेतील मंत्री व पदाधिकाऱ्यांसह विरोधक देखील छगन भुजबळ यांच्या राजीनामा्यांची मागणी करत होते.
मात्र मी 16 नोव्हेंबरलाच राजिनाम देऊन 17 नोव्हेंबर रोजी अंबड येथील सभेस गेलो त्यामुळे तुम्ही राजीनामा्यांची काय मागणी करता तुमच्या मागणीच्या आधीच मी राजीनामा दिला असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला असला तरी राज्य सरकारने तो राजीनामा अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती मिळाली आहे…