राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते घनश्याम शेलार यांनी केला BRS मध्ये प्रवेश ; मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीत केला प्रवेश ; राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का
अहमदनगर – राष्ट्रवादी पक्षाचे नेते घनश्याम शेलार यांनी BRS चे मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीत BRS मध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घरावर काळे फासण्याची घटना ताजी असतांनाच घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा अहमदनगर जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे.
घनश्याम शेलार हे मूळचे भाजपचे त्यांची राजकीय कारकीर्द भाजपधून सुरू झाली, नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीत गेल्या विधान परिषदेवर संधी नाकारल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत पुन्हा त्यांनी पक्ष बदलला व शिवसेनेत गेले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेलार यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली होती. मात्र, युती झाल्याने ही जागा भजपा कडे जाणार असल्याने शेलार यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता.आणि पुन्हा ते राष्ट्रवादीत काँग्रेस मध्ये आले होते.
मात्र ऐनवेळी ती उमेदवारी नाकारण्यात आली होती. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांना अखेर विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी प्रतिस्पर्धी म्हणून भाजपचे बबनराव पाचपुते यांना कडवी झुंज देऊन घनश्याम शेलार यांनी आपली राजकीय ताकद दाखवली होती मात्र अवघ्या काही हजार मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पुन्हा काही महिन्या पासून त्यांनी श्रीगोंदा मतदारसंघ पिंजून काढण्यात सुरुवात केली होती गाव सभा घेऊन त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली होती.
मात्र अलीकडच्या काळात राष्ट्रवादीमध्ये झालेले फेरबदल आणि राष्ट्रवादीकडून पुन्हा काही वेगळ्या नावांची चर्चा सुरू झाल्यामुळे घनश्याम शेलार नाराज असल्याचे कार्यकर्ते सांगत होते त्यामुळे घनश्याम शेलार यांनी अखेर आपला पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला करत BRS मध्ये प्रवेश केला आहे.