अहमदनगर – अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिसांच्या वतीने आता हद्दीत पायी पेट्रोलिंग देखील सुरू करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पायी पेट्रोलिंग मध्ये गुन्हे शोध पथकाने एका महीलेसह दोघां आरोपींना अटक केली आहे.
अटक केलेले आरोपी हें चोरीचा माल विकण्यासाठी येणारं असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली आहे. करण्यात आलेली कारवाई हि एक वेळेस एक कारवाई नसून तर वेगवेगळ्या ठिकाणी तीन कारवाया गुन्हे शोध पथकाच्या वतीने करण्यात आल्या असून यामध्ये तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अहमदनगर शहर परिसरातुन मोबाईल चोरी करून, चोरी केलेला माल विकण्यासाठी शहरातील काटवन खंडोबा येथे आलेल्या परवेज महेबूब या आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले. तर चोरी करण्यात आलेली दुचाकी मोपेड गाडी विकण्यासाठी आलेल्या ऋषभ क्षेत्रे याला चाणक्य चौकातुन अटक करत त्याच्याकडून गाडी जप्त करण्यात आली. तसेच एसटी बस मध्ये गर्दीचा फायदा घेत पाकीटमार असलेल्या महिलेला देखील पोलिसांनी सुरू केलेल्या पायी पेट्रोलिंगवेळी अटक केली आहे.
PI चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार सुरू केलेल्या पायी पेट्रोलिंगचा असाही फायदा :-
शहरात चोऱ्या, घरफोड्या,पाकीटमार हें दिवसेंदिवस वाढत आहे. अश्यातच आता कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पायी पेट्रोलिंगच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक यादव यांच्या सूचनेनुसार पायी पेट्रोलिंगकरत असतांना गुन्हे शोध पथकाला चोरी केलेला माल विकणाऱ्या आरोपींची टोळी हाताला लागली असून पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.
रोख रक्कम घेऊन जाण्याचे नागरिकांना आवाहन-
पुणे बस स्थानकावर ११ जून आणि २९ मे रोजी नागरिकांचे पैसे चोरणाऱ्या महिलांना कोतवाली पोलिसांनी पकडलेले आहे. त्यांच्याकडून अनुक्रमे ७,३०० आणि ३,१०० रुपये जप्त केलेले आहेत. त्याबाबत ज्यांचे पैसे चोरी गेले त्यांनी पोलीस स्टेशनला कळविले नाही. सदर दिवशी ज्यांचे पैसे चोरीला गेलेले आहेत त्यांनी कोतवाली पोलिसांना तक्रार देऊन रक्कम घेऊन जावी.