हत्याराच्या अनुषंगाने शहरात दोन ठिकाणी कोतवाली पोलिसांची नाकाबंदी ; वाहनांची करण्यात आली तपासणी
अहमदनगर – अहमदनगर शहरातील इम्पिरियल चौक आणी रामचंद्र खुंट येथे कोतवाली पोलिसांच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली. हत्याराच्या अनुषंगाने पोलिसांनी अचानकपणे नाकाबंदी करत दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची तपासणी केली आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या उपस्थितीत व कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली कोतवाली पोलिसांनी नाकाबंदी करत वाहन तपासणी केली आहे.
अहमदनगर शहरात परराज्यांतून धारदार हत्यारं अहमदनगर शहरात आणण्यात येतं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत १२ धारदार हत्यारं जप्त करत तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. तर कोतवाली अनं तोफखाना पोलिसांनी देखील कारवाई करत अनेकांच्या मुसक्या आवळल्या आहे. तसेच अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या मारामाऱ्या आणी खुनाच्या घटना बघता धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने अचानकपणे शहरातील इम्परीयल चौक आणी रामचंद्र खुंट येथे वाहनांची तपासणी करण्यात आली.
तसेच गेल्या काही दिवसांपासून दोन गटात वाद विवादाच्या घटना चालू आहे. या घटना बघता दाखल गुन्ह्यामध्ये धारदार शस्त्राचा वापर करण्यात आले असल्याचे कारणेे दाखल आहे. नगर शहरात ओंकार भागानगरे या युवकाचा खून देखील तलवारीने वार करून करण्यात आला होता तर अकोले येथे देखील लव्ह जिहादच्या संशयावरून अशरफ शेख नामक युवकाची तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला जीवे ठार करण्यात आले होते. एकंदरीत अहमदनगर शहरासह जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांमध्ये धारदार हत्याराचा वापर सर्रासपणे करण्यात येतं असल्याच आढळून आलं आहे. दरम्यान परराज्यांतून अहमदनगर मध्ये येणाऱ्या हत्यारंनां पायबंद घालायचे असल्यास अचानकपणे नाकाबंदी करूनच वाहनांची तपासणी करने गरजेचे आहे
त्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील इम्पिरियल चौक आणी रामचंद्र खुंट येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली….