विरोधी पक्ष नेत्याचच बंड ! अजित पवार घेणारं उपमुख्यमंत्री पदाची शपथ अहमदनगर मध्ये रामदास आठवलेंनीं भुजबळांचे देखील दिलें होते संकेत !
Dailytimes – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांनीं बंड करत भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान विरोधी पक्ष नेते असलेले अजित पवार हें उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.
दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी नगर मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हें जुलै मध्ये होणारं असल्याच सांगितल होतं. तर अहमदनगर मध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी मंत्रि रामदास आठवले यांनी छगन भुजबळ यांना NDA मध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होते. त्यानूसार आज रविवारी मिळालेल्या माहिती नुसार अजित पवारांच्या बंडात छगन भुजबळ देखील सामील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे
खरंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हें गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर म्हणा किंवा पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान स्वःत अजित पवारांनी मला विरोधी पक्ष नेतेपद नको असल्याची जाहीरपणे भूमिका देखील व्यक्त करून दाखवली होती. तसेच नाराज असलेले अजित पवारांनी राष्ट्रवादीला 1 जुलै पर्यंत योग्य तो निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दीला होता. मात्र दिलेला अल्टिमेटची वेळ संपल्याने अखेरकार अजित पवारांनी 2 जुलै रविवारी बंड करत भाजपा सोबत जाण्याची तयारी दर्शवल्याचे दिसत आहे
अजित पवार आणी त्यांचं बंड हें महाराष्ट्रला किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला नव नाही. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाकरी फिरवत पक्षाचे कार्याध्यक्ष पद हें सुप्रिया सुळे यांच्याकड़े देताच अजित पवार नाराज असल्याचे दिसत होते अनं आज त्यांची खदखद बाहेर पडली आहे !