6 बुलेटसह दोन ट्रँक्टर जप्त तर दोघां आरोपींच्या आवळल्या मुसक्या ; LCB ची कारवाई
अहमदनगर – अहमदनगर शहरात बुलेट दुचाकी सह वाहन चोरीचे प्रमाण वाढत जात होते दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केलेल्या कारवाईत तब्बल 6 बुलेट दुचाकीसह दोन ट्रँक्टर जप्त करण्यात आले आहे. तर दोघां आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार वाहन चोरी करणारी टोळीला अटक करण्याचे आदेश पथकाला देण्यात आले होते. त्यानुसार शेवगाव – गेवराई रोडवर सापळा लावण्यात आला होता. यावेळी दोन इसम काळ्या रंगाच्या विनानंबर बुलेट मोटार सायकलवर येताना दिसताछा आरोपींना अटक करण्यात आली. वैभव ऊर्फ सोमा बाबासाहेब सुरोडे, आणी किरण अंबादास गर्जे, या आरोपींना अटक करून तपास केला असता त्यांच्याकडुन तब्बल 6 बुलेट दुचाकी आणी ट्रँक्टर आढळून आल्याने पोलिसांनी 25 लाख रूपय किंमतीच्या असलेल्या बुलेट जप्त केल्या आहेत.
खरंतर अटक केलेले वैभव ऊर्फ सोमा बाबासाहेब सुरोडे, आणी किरण अंबादास गर्जे हें आरोपी दुचाकी वाहनांची चोरी करून ते वेगवेगळ्या तालुक्यातील व जिल्ह्यातील साथीदारांना देत असे व त्यांचे साथीदार चोरी केलेल्या वाहनांची व्हिलेवाट लावत असल्याची कबुली आरोपींनीं दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्या तब्बल पाच साथीदारांवर गुन्हे दाखल केले असून त्यांचा तपास करण्यात येतं आहे.
दरम्यान अटकेतील आरोपींनीं अहमदनगर, बीड, नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन बुलेट व ट्रॅक्टर चोरी केल्याची माहिती दिल्याने अहमदनगर, बीड, नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्हात देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची करवाई पोनि/. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी, पोना/रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संदीप दरदंले, संतोष खैरे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, पोकॉ/जालिंदर माने, अमृत आढाव, मेघराज कोल्हे व चापोकॉ/अरुण मोरे यांनी केली आहे