हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक ; शहर परिसरातून आरोपींचा सिने स्टाईल पाठलाग करत केली अटक
अहमदनगर – साहित्यिक तसेच लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शनिवारी अहमदनगर शहरातील रासने नगर या भागात प्रसिद्ध साहित्यिक तथा लेखक कुलकर्णी यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता दरम्यान याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत
कुलकर्णी ज्या महाविद्यालयात मुख्यधापक आहे त्या महाविद्यालया भोंवती अक्षय सब्बन या आरोपीची अतिक्रमण करून टाकन्यात आलेल्या पान टपरी बाबत कुलकर्णी यांनी महानगर पालिकेत अर्ज केला होता त्यानुसार महापालीकेने करावाई देखील केली होती. महापालिकेने कारवाई केल्याने त्याचा राग मनात धरून अक्षय सब्बन याने त्याच्या 5 साथीदारासह कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला होता.
या संदर्भात शनिवारी तोफाखाना पोलीस ठाण्यात 324,341,323 कलमासाह गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान कुलकर्णी यांना लोखंडी रॉडने माराहाण करण्यात आल्याने त्यांना उपचारर्थ खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल्या नंतर पोलिसांनी दाखल गुन्ह्यामध्ये कलम 307 चा वाढीव गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान पोलिसांनी शहरातील कोंड्यामामा चौक येथे आरोपीचा सिने स्टाईल पाठलाग करत आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये अक्षय सब्बन, चैतन्य सूडके,आणि एक अल्पवीयन अश्या एकूण तिघां आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे तर अक्षय पूर्ण नाव माहीत नाही आणि सनी जगधने हे दोन आरोपी अद्यापही फरार आहे..