‘तेरी मेरी यारी गुटखा लय भारी’ शहरात गुटखा माफीये सक्रिय ; भल्या भल्या व्हाईट कॉलर वाल्यांनी गुटख्यात लावला पैसा?
अहमदनगर – ‘तेरी मेरी यारी गुटखा लय भारी’ या पंक्तीनुसार अहमदनगर शहरामध्ये गुटखा माफीये पुन्हा जोमाने सुरु झाले आहे. एक दोन नव्हे तर गुटख्याच्या धंद्यात गुटखा माफीयांची भली मोठी साखळी तयार झाली आहे? मात्र असं असतांना देखील पाहिजे तशी कारवाई होतांना दिसत नाही हे विशेष.
गेल्या चार दिवसांपूर्वी जेष्ठ साहित्यिक तथा लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आरोपिंना अटक केली खरी मात्र मिळवू आलेल्या माहितीनुसार शहरातील टपऱ्यांवर विकण्यात येणाऱ्या गुटख्याच्या टपरीला विरोध केल्याने हा हल्ला करण्यात आला. हल्ला झाल्यानंतर साहित्यिक लेखकाची साधी तक्रार घेण्यासाठी त्यांना ताटकळत तासंतास पोलीस ठण्यात बसावे लागले यावरून पोलिसही किती संवेदनशील आहे हे सिद्ध झाले.
खरंतर राज्यात अवैध गुटखा, सुगंधी सुपारी यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न औषध प्रशासनाची मात्र अन्न औषध प्रशासनचं ज़ोपेच्या गोळ्या घेऊन जोपलं कि जोपण्याची नौटंकि करत आहे याबाबत देखील प्रश्न उपस्थित होतं आहे!
परराज्यातून महाराष्ट्रात अवैध पणे दाखल होणाऱ्या गुटख्याला अन्न औषध प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन पाठीशी घालण्याचे काम तर करत नाही ना? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे. अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने गुटखा माफीयांवर कारवाई करत चांगलीच कंबर कसली होती मात्र स्थानिक गुन्हे शाखा वगळता गुटखा माफियांवर कारवाई होतं नसल्याने गुटखा माफीयांनी जिल्ह्यासह शहरात पुन्हा डोके वर काढले आहे…
गुटख्याच्या साखळीत व्हाईट कॉलर वाल्यांचा सुळसुळाट ?
शहरातील गुटखा माफियांना आता सुशिक्षित व्हाईट कॉलर देखील पार्टनर होतं चालले आहे? दिवसभर लोकांच्या प्रकरणात मध्यस्थी करून पैशे कमवायचे किंवा जागेच्या खरेदी विक्रीत दलालाचे काम करून एक शॉट हाणायचा आणि गुटखा माफीयांसोबत पार्टनरशिप करून आलेला पैसा वापरायला द्यायचा. गुटख्याच्या धंद्यात पैशे देऊन पार्टनर झाल्याने दर महिन्याला गुटख्यातुन नफा कमवायचा असा साईट बिजनेस सध्या शहरात सुरु झाला आहे? तर याची सखोल चौकशी केल्यास एक ना अनेकांची व्हाईट कॉलर काळी पडल्याशिवाय राहणार नाही…!
युवकांच्या जीवाची राख रांगोळी करून बक्कळ पैश्यांच्या नशेत हैवान झालेल्या या माफियांसोबत आता सुशिक्षित व्हाईट कॉलर वाल्यांची भली मोठी साखळी तयार झाली आहे? गुटखा माफी्यांसोबत असलेल्या दोस्तीचा फायदा घेत अनेक जण त्या माफी्यांचे पार्टनर झाले आहे. एवढेच नव्हे तर कांहिनी मला पार्टनर म्हणून घेतले नाही तर तुझी टीप पोलिसांना देईल अशी भीती दाखवून ‘तेरी मेरी यारी’ म्हणत गुटख्याच्या धंद्यात सामील झाले आहे.? खरंतर पोलीस म्हणा किंवा अन्न औषध प्रशासन यांचा दरारा संपल्याने अश्या माफी्यांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत चालली आहे..
परराज्यातून आलेला गुटख्याचा माल हा मध्यरात्रीच्या वेळी शहरात उतरवीला जातो. उतरविलेला माल माफीये होलसेल मध्ये विक्री तसेच फेरीवाल्यांना देतात, हेच फेरीवाले शहरासह उपनगरातील पान टपऱ्यांवर विकतात. आणि टपरीचालक हे विष पेरतात? यामध्ये नफा भरपूर असल्याने व्यवस्थेला देखील बंद पाकिटात ठेवल्यासारखे हे माफीये वावरत आहे..
गुटख्या पासून जीवितास धोका असला तरी हे माफीये युवकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार सध्या शहरात सुरु आहे. मेलेल्यांच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्या या माफियांना पैश्या शिवाय काही दिसेनासे झाले आहे. त्यामुळे आता तरी पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाने जातीने लक्ष घालून बंदी असलेल्या गुटख्याला शहरातून हद्दपार करावे व गुटखा माफीयांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व सामान्य जनतेतुन होतं आहे.