पुण्यात भरदिवसा थरार ; चार गोळ्या घालून शरद मोहळची करण्यात आली हत्या
पुणे – गुन्हेगारी जगतातला कुख्यात गुंड असलेला शरद मोहोळ याच्यावरती आज कोथरूड परिसरामध्ये चार गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, शरद मोहोळ हा आपल्या घरातून बाहेर पडताच हल्लेखोरांनी त्याच्यावरती हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये शरद मोहळ हा जखमी झाला होता दरम्यान शरद मोहोळ याला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वी शरद मोहोळ याचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी जाहीर केलं
शरद मोहोळ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने पुण्यातील कोथरूड परिसरात विशेष करून सुतारदरा या भागामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा मोठा फौंज फाटा या ठिकाणी दाखल करण्यात आला आहे
कुवीख्यात गुंड शरद मोहोळ यांची हत्या पूर्व वैमानस्यातून तसेच त्याच्यात काही साथीदारांनी केली असल्याचा संशय पोलिसांकडून प्राथमिक दृष्ट्या व्यक्त करण्यात येत आहे असं असलं तरी ज्या ठिकाणी शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही ताब्यात घेऊन त्याचप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या पोलीस तपास करत आहेत
कोथरूड परिसरामध्ये ज्या ठिकाणी शरद मोहोळ यांच्यावर हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी पोलिसांना चार काडतुसे देखील सापडले आहेत दरम्यान पुणे येथील कोथरूड परिसरामध्ये तणावाचं वातावरण असून पोलिसांचा मोठा फौंज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे
कोण होता शरद मोहोळ?
पुणे येथील कोविख्यात गुंड संदीप मोहोळ यांच्या गाडीवर ड्रायव्हर असलेला शरद मोहोळ हा संदीप मोहोळ याची हत्या झाल्यानंतर शरद मोहोळ यानेच आपल्या गॅंग ची कमान सांभाळली, शरद मोहोळ याच्यावर हत्या तसेच हत्येचा कट अपहरण खंडणी यासारखे एक ना अनेक गुन्हे दाखल आहेत, गुन्हे दाखल असलेल्या शरद मोहोळ याची काही दिवसापूर्वीच येरवडा कारागृहातून सुटका झाली होती. कुख्यात गुंड असलेला शरद मोहोळ याची सुटका झाल्यानंतर काही संघटनेच्या माध्यमातून तसेच राजकीय व्यासपीठावर शरद मोहोळ दिसत होता आपलं बिघडलेलं आयुष्य सुधारण्याचा तो प्रयत्न करत करत होता, मात्र असं असलं तरी गुन्हेगारी जगतातील त्याच्या साथीदारांसोबत त्याचं कनेक्शन होतं, आणि त्यामुळेच कधी काळी त्याचे साथीदार असलेल्यांनी त्याच्यावर पूर्व-वैमान्यातून हल्ला करून त्याचा खून केल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करत आहे