तरुण – तरुणींचे कॅफेमध्ये अश्लिल चाळे ; अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या शहरातील ‘’त्या’’ ६ कॅफेमध्ये LCB छापे
अहमदनगर – अहमदनगर शहरातील एक ना अनेक कॉफी शॉपच्या सुरु असलेल्या कॅफेमध्ये छोटी छोटी कंपार्टमेंट बनवून तरुण मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी मोबदला घेऊन जागा उपलब्ध करून दिली जात आहे अश्या तक्रारी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना आल्यानंतर याबाबत कॅफेची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी नगर शहर परिसरासह सावेडी उपनगरातील लव्ह बर्ड्स कॅफे, बाबाज कॅफे, हर्षांज कॅफे, झेड के कॅफे, गोल्डरश कॅफे, रिज किंग कॅफे या ठिकाणी तपासणी केली असता कॉफी शॉपच्या नावाखाली तरुण मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी कंपार्टमेंट बनवून दिल्याचे आढळून आले यावेळी अनेक तरुण मुले मुली नको त्या अवस्थेत अश्लील चाळे करताना मिळून आले आहे.
दरम्यान यावेळी संबंधित सर्व कॅफे मध्ये छोटे छोटे कंपार्टमेंट अश्लील चाळे करण्यासाठी मुला मुलींना करून देण्यात आल्याचे आढळून आले. या संदर्भात कॅफे मालकाला कॅफेच्या परवान्यासाठी विचारपूस केली असता कोणताही परवाना कोणत्याही कॅफे चालकाकडे नसल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महेश तेलोरे, ऋषिकेश निर्मल, रोहित साठे, हर्षवर्धन काकडे, सागर उदमले, रवी चौरे, अर्जुन कचरे,या कॅफे चालकांवर कोतवाली तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून ४ चालकांना अटक केली आहे.
खरंतर अहमदनगर शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली असलेले कॅफे हे तरुणांना व्यसन तसेच अश्लील चाळे करण्यासाठी थाटण्यात आले होते. याबाबत पोलिसांना तक्रारी येताच पोलिसांनी छापे टाकत कारवाई केली आहे. शाळा कॉलेजच्या नावाखाली घरातून बाहेर पडल्यावर खरंतर आपला मुलगा किंवा मुलगी कुठं जाते, कोणासाबत राहते, घराबाहेर किती वेळ राहते, मोबाईलवर कोणासोबत बोलते या संदर्भात पालकांना माहिती होणे गरजेचे आहे. मात्र अलीकडच्या काळात तसं होतांना दिसत नाही हे विशेष.
काही वर्षांपूर्वी सामान्य कुटूंबीयांच्या तरुण तरुणीकडे कॉम्प्युटर ( संगणक ) नव्हते त्यावेळी सायबर कॅफेचा उपयोग होतं होता आज मात्र प्रत्येकाकडे मोबाईल किंवा लपटॉप असल्याने फारसा सायबर कॅफेचा उपयोग होतांना दिसत नाही याउलट नवी पिढी अश्लील चाळे करण्यासाठी कॉफीशॉपच्या नावाखाली भलत्याच कॅफेचा उपयोग करताना दिसत आहे.
लॉज मध्ये पोलिसांच्या धाडी पडतात त्यामुळे तरुणांना कॉफीशॉपच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी कॅफे उपलब्ध करून देत बक्कळ पैशे कामाविण्याचा नवा धंदा शहरात सुरु झाला असून अश्या भामट्या कॅफे चालकांवर देखिल कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात अश्लील चाळे करताना आढळून आलेल्या तरुण तरुणीना पोलीसांनी त्यांच्या पालकांना बोलावून घेत त्यांच्या ताब्यात दिले आहे. असं असलं तरी आता स्वतःची आबरू वाचावीण्यासाठी पालकांनी देखील तितकेच दक्ष राहण्याची गरज आहे अन्यथा आपल्या दुर्लक्ष आणि हलगर्जीपणामुळे अश्या कॅफे चालकांच्या माध्यमातून आपली आबरू चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही हे ही तितकेच खरे……..