कोतवाली,तोफखाना, भिंगार कॅम्पसह जिल्ह्यातील 24 पोलीस ठाण्यासह विभागात नव्या अधिकाऱ्यांच्या झाल्या नियुक्त्या ; “या” अधिकाऱ्यांच्या झाल्या कोतवाली, तोफखाना, भिंगार पोलीस ठाण्यात नियुक्ती
अहमदनगर – लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर तसेच जिल्ह्यात तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या दरम्यान आज जिल्ह्यातील 24 नव्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस ठाण्यासह विविध विभागात नियुक्त्या करण्यात आल्या आहे.
करण्यात आलेल्या नव नियुक्त्या मध्ये शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात योगेश जगन्नाथ राजगुरु तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात माणिक चौधरी या पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्शवभूमीवर निवडणूक आयोगाने बदल्या करण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांना दिल्या होत्या त्यानुसार 31 जानेवारी पर्यत अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले होते. दिलेल्या आदेशानुसार शहर तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या करण्यात आल्या आहे. शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यात नव नियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत…..