दाराडेंचा दरारा..! शहरातील हमाल वाड्यातील कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांचा छापा ; मोठे मासे मात्र पाण्यातच…!
अहमदनगर – अहमदनगर शहरातील हमाल वाड्यात कत्तल खान्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये पोलिसांनी तब्बल 7 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त केले आहे. संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात मोईन असरार सय्यद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
गो हत्या बंदी असताना देखील शहरातील हमालवाडा या ठिकाणी एका बोलेरो पिकअप मधून गो हत्या करून त्यामध्ये तब्ब्ल 7 लाख रुपयाचा मुद्देमाल आढळून आला होता. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर ही पहिलीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. खरंतर करण्यात आलेली कारवाई ही जरी मोठी असली तरी या धंद्यातील मोठे मासे मात्र अद्यापही पाण्यातच आहे हे मात्र विशेष,
शहरातील हमालवाडा येथे एक नां अनेकांचे कत्तलखाने राजरोजपणे सुरु आहे. दरदिवशी एक एक हजार किलो मांस अहमदनगरहुन पुणे तसेच मुबंईकडे पाठविला जातं आहे. मात्र यावर ठोस कारवाई होतांना दिसत नाही. पोलिसांच्या भीतीने ही मंडळी मांस विक्रीसाठी चारचाकी गाड्यांचा देखील वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे मुबंई पर्यत 150 ते 160 रुपये प्रति किलो प्रमाणे दर दिवसा हजारो किलो मांस मोठं मोठे गाड्या तसेच चार चाकी वाहनात पाठवत असल्याच देखील बोललं जातं आहे. विशेष म्हणजे कोतवाली पोलीस ठाण्याला अनेक अधिकारी लाभले त्यांच्या नेतृत्वाखाली गो हत्या करणाऱ्यावर कारवाई देखील करण्यात आली मात्र या गो हत्येमागचे मोठे मासे अद्यापही कोणाच्या गळाला लागले नाही. कत्तलखाण्याच्या माध्यमातून बक्कळ पैसा जमा करणारे हे मोठे मासे कायम समुद्राच्या तळाला बसून आपला धंदा चालवीत असल्याची चर्चा आहे.
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आपल्या कामाचा दरारा भल्या भल्यांना दाखविला असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. त्यामुळे आत्ता पर्यत खोल पाण्याच्या तळात बसवून धंदा चालवीणारे ते मोठं मोठे मासे अनेक अधिकाऱ्यांच्या गळाला लागले नसून. दराडेंच्या गळाला ते मोठे मासे लागतील का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.