अहमदनगर – अहमदनगर शहरात अतिशय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकात फेरबदल करण्यात आले आहे. नवा गडी नवा राज या म्हणी प्रमाणेच गुन्हे शोध पथकात नव्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसातच नव्या जुन्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गुन्हे शोध पथकात नव्याने नियुक्त केले आहेत.
गुन्हे शोध पथकामध्ये नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे :-
गुन्हे शोध पथकात फेरबदल केल्यानंतर यामध्ये नव्याने गुन्हे शोध पथकातील प्रमुख इन्चार्ज म्हणून पीएसआय प्रवीण पाटील, तन्वीर शेख, रवींद्र टकले, शाहिद शेख, अविनाश वाकचौरे, संदीप पितळे,सलीम शेख, संगीता बडे, अभय कदम, दीपक रोहकले, तानाजी पवार, सत्यजित शिंदे, सुरज कदम, प्रमोद लहारे, अतुल काजळे, शिवाजी मोरे, महेश पवार आणि सोमनाथ केकान अशा एकूण 18 पोलीस कर्मचाऱ्यांच्या नव्याने गुन्हे शोध पथकामध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत….