वकील दांपत्याचा खडणीसाठी खून ; दोघांच्या चहेऱ्यावर प्लास्टिक पिशव्या टाकत केला खून ; दोघांचा खून करून हातापायाला दगड बांधून फेकले विहिरीत ;
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील राहूरी तालुक्यातील मानोरी येथे राहणारे वकील दांपत्य राजाराम जयवंत आढाव व मनीषा राजाराम आढाव यांचा खून करण्यात आला असून आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
वकील दांपत्य हे 25 जानेवारीपासून बेपत्ता झाले होते या संदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात मिसींगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाला तपासाच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वकील दांपत्य यांच्याकडे कोण कोणत्या आरोपीचे वकील पत्र होते यासह त्यांच्या घरी कोण येऊन गेला या बाबत cctv तसेच तांत्रिक दृष्ट्या तपास सुरु केला होता.
तपास सुरु असतांना पोलिसांना cctv च्या आधारे वकील दांपत्याच्या घराजवळ एक चारचाकी कार फिरताना आढळून आली होती त्यानुसार पोलिसांनी तपास करत आरोपी किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग याला अटक केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मयत वकील दांपत्याकडे दुशिंग आरोपीचा वारंट बाबतचे प्रकरण होते त्याने त्याचे साथीदार सागर खांदे, शुभम महाडिक, हर्षल ढोकणे,आणि बबन मोरे यांच्यासह वकील दांपत्याच्या घरात घुसून त्यांचा काही तास हात पाय बांधून छळ करत 5 लाख रुपयाची मागणी केली होती मात्र वकील दांपत्य आढाव यांनी पैशे देण्यास नकार दिल्याने आरोपीनी प्लास्टिक पिशव्या त्यांच्या तोंडात टाकून श्वास गुदमरून त्यांचा खून केला तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी एका साडीला दगड बांधून तसेच दोघांचे हात पाय बांधून त्यांना एका वहिरीत फेकून देण्यात आले असल्याची कबुली आरोपी दुशिंग याने दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठया शीताफिने cctv तसेच वकील दांपत्याच्या वकील पत्रवरून आरोपीचा शोध घेतला असून 5 पैकी 4 आरोपीना अटक करण्यात आली आहे.