“गो हत्या” कायदा फक्त नावारुपालाच ? तर कत्तलखाने बंदची भूमिका फक्त एका दिवसापूरती का ?
अहमदनगर – महाराष्ट्र राज्यात गो हत्या कायदा अमलात आणला गेला मात्र या कायद्याची अंमलबजावणी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात होतांना दिसत नाही ही शोकांतिका म्हणावी का दुर्दैव. आज केंद्रात भाजपाची सत्ता आहे तर महाराष्ट्र राज्यात महायुतीच सरकार. त्यामुळे भाजपाच्या राज्यात कायदा करून देखील कठोरपणे अंमलबजावणी होत नसेल तर याला शोकांतिका म्हणावी की दुर्दैव हाच प्रश्न समोर उभा ठाकला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेसह नगर शहरात गाईंची कत्तले राजरोजपणे होत आहे. मात्र याकडे पोलिसांचे सपशेल दुर्लक्ष असल्याची चर्चा नगर शहरात होत आहे. कोतवाली पोलीस ठाणे असो की तोफखाना पोलीस ठाणे या दोन्ही ठाण्याच्या हद्दीत गो हत्या होत असतांना पोलीस मात्र ज़ोपेचे सोंग घेत असतील तर कुंपणच शेत खात असल्याची भावना जणमाणसामधून व्यक्त होत आहे. कोतवाली, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन चार चाकी वाहना मध्ये गो हत्या करून गोमांस भरून विक्रीस नेले जाते मात्र याची खबर पोलिसांना लागत नाही ही मजेचीच बाब नाही का…
22 जानेवारी रोजी आयोध्येत प्रभू श्री राम यांची ५०० वर्षानंतर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या प्राणप्रतिष्ठेच्या पार्शभूमीवर हिंदुत्ववादी संघटनानीं त्या दिवशी कत्तलखाने बंद करण्याचे निवेदन दिले. आणि देण्यात आलेल्या निवेदनानुसार अहमदनगर शहरातील कत्तलखाने एका दिवसांपुरते बंद देखील करण्यात आले. परंतु तो दिवस संपताच शहरातील कत्तलखाने जैसे थे झाले आहे. त्यामुळे पुन्हा राजरोसपणे होणाऱ्या गो हत्येसाठी कडक कारवाई होतांना दिसत नाही आणि कोणी तशी मागणी देखील करत नाही हे विशेषच.
खरंतर धार्मिक भावना दुखावून गो हत्या करणारे जितके खाटीक जबाबदार आहे तितकच जबाबदार सध्याच सरकार असल्याची टीका शिर्डी येथे पार पडलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यातून एका युवक शेतकऱ्याने केली होती. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर आहे. जर राज्य सरकारने दुधाला योग्य भाव दिला तर दूध धंदा करणारे शेतकरी आपल्या गाईला कधी विकणारच नाही आणि त्यामुळे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या सरकारला त्या शेतकऱ्यांच दुःख दिसत नसल्याची भावना व्यक्त करत त्या युवा नेत्याने भाजपाच्या हिंदुत्वावर आरोप करत सभा गाजवली होती.
आज शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हमालवाडा परिसर असो किंवा तोफखाना हद्दीतील कोठला परिसर असो या परिसरात मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या केली जातं आहे. एवढेच नव्हे तर हजारो किलो गोमांस चारचाकी किंवा मोठ्या वाहनात भरून पुणे मुबंईकडे पाठविले जातं आहे. गोहत्या करणाऱ्याना कोणताही पोलिसांचा धाक राहिलेला नाही त्यामुळे आता तरी कोतवाली व तोफखाना पोलिसांनी कठोर कारवाई करून कायद्याची अंमलबजावनी करण्याची गरज असल्याच मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अन्यथा गो हत्या कायदा फक्त नावारुपालाच का? हाच प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडल्या शिवाय राहणार नाही हे मात्र नक्की….