Politicalमहाराष्ट्रविशेषशहर

शरद पवारांची खेळीने निलेश लंके बालबाल बचावले ; शरद पवारांनी अजित पवारांचा गेम लावला उलथून मात्र लंकेच्या पक्षप्रवेशात आला तांत्रिक अडथळा

अहमदनगर – लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके हे अनधिकृत रित्या शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोट्यात सामील झाले खरे. मात्र शरद पवारांच्या एका खेळीमुळे आज निलेश लंके बालबाल बचावले आहे.

अहमदनगर दक्षिणेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे कमळ फुलताच निलेश लंकेनी थेट पुणे गाठले. मात्र निलेश लंके हे रस्त्यात असतांनाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लंकेना सूचक इशारा दिला. जर निलेश लंके यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना आमदारकीचा व पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल अन्यथा लंकेवर पक्षांतरबंदीची कारवाई करण्यात येईल असा थेट धमकीवजा इशाराच अजित पवारांनी दिला होता..

मात्र राजकारणातील चाणाक्ष असलेल्या शरद पवारांनी मुद्दा हेरला अनं लंकेवर कारवाई करण्यात येणार असा धमकीवजा इशारा देणाऱ्या अजित पवारांचा गेम उलथुन लावला आहे…

शरद पवारांनी कसा उलथून लावला अजित पवारांचा गेम : पहा नेमकं घडलंय काय…

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या गोट्यात प्रवेश केला खरा मात्र प्रवेशाची घोषणा कोणीही केली नाही.. लंके यांनी मी शरद पवारांच्या विचारधारेसोबत असल्याची प्रतिक्रिया दिली तर शरद पवारांनी देखील विधानसभेचा किस्सा सांगत निलेश लंकेचे मी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया दिली त्यामुळे जाहीरपणे मी शरदचंद्र पवारांच्या पक्षात गेलो असल्याच ना लंकेनी कबुल केलं ना ही शरद पवारांनी मी त्यांना पक्षात घेतले असल्याच वक्तव्य केलं. त्यामुळे निलेश लंके हे शरद पवारांच्या गोट्यात जाऊन देखील कारवाई करण्याइतपत त्यांनी कोणतेही शब्दप्रयोग न केल्याने अजित पवारांचा इशारा हे इशाराचं राहिला आहे.

कारण प्रवेश जाहीर झाला करण्यात आला असता तर लंकेवर पक्षांतरबंदीची कारवाई होऊन त्यांना पुढील सहा वर्ष निवडणूक लढविण्यास अडचण येऊ शकली असते. हे ध्यानात घेऊन निलेश लंके यांच पक्षप्रवेश लांबणीवर टाकण्यात आला. आगामी काळात कदाचित आमदारकीचा राजीनामा देऊन ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करतील. आजच्या पत्रकार परिषदेत निलेश लंके, जयंत पाटील आणि शरद पवार यापैकी कुणीही लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतायत असे म्हणालेल नाही. फक्त त्यांच्या हातात तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते. त्यामुळे शरद पवार यांनी आपला हेतूही साध्य केला आणि निलेश लंके यांनाही पक्षांतरबंदीच्या कारवाईपासून वाचवले

खरंतर शरद पवारांच्या या खेळीमुळे निलेश लंके जरी शरद पवारांच्या गोट्यात आले असले तरी अधिकृत रित्या लंके हे सध्या तरी अजित पवारांच्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच अधिकृत आमदार असणार आहे. मात्र येणाऱ्या दोन दिवसात जर निलेश लंके यांना शरद पवारांकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली तर मात्र आपल्या आमदार पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यतात्वाचा राजिनामा निलेश लंके यांना द्यावा लागणार आहे हे मात्र नक्की….

उमेर सय्यद…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
× How can I help you?