Politicalमहाराष्ट्र

निवडणुकीची इच्छा व्यक्त करणे आणि त्याचे वास्तविकते मध्ये रूपांतर होणे यात मोठा फरक ; निलेश लंकेच्या उमेदवारी वरून सुजय विखेंचा टोला

अहमदनगर – अहमदनगर दक्षिण मतदारसंघामधून महायुती कडून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनाचं अखेरकार उमेदवारी मिळाली आहे. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळताच महायुतीचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मात्र लंके यांनी प्रवेश केला असला तरी त्यांना अदयापही उमेदवारी जाहीर झाली नसल्याने जो पर्यत महाविकास आघाडीची अधिकृत यादी जाहीर होत नाही तोपर्यंत कोणत्याही उमेदवाराला ग्राह्य धरू नका अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

एवढेच नव्हे तर निवडणुकीची इच्छा व्यक्त करणे आणि त्याचे वास्तविकते मध्ये रूपांतर होणे यात मोठा फरक असल्याचा खोचक टोलाच सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना लागवला आहे. त्यामुळे शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या निलेश लंकेना लोकसभेची उमेदवारी जाहीर होणार का याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातं आहे.1

शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जणमाणसाची भावना आहे की मी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी प्रतिक्रिया देत लोकसभा निवडणुक लढाविण्याचे संकेत लंके यांनी दिले आहे.

मात्र गेल्या अनेक दिवसापासून लोकसभा निवडणुकी संदर्भात विचारच केला नसल्याची प्रतिक्रिया देणारे लंकेनी अचानक पणे लोकसभा निवडणूक लढाविण्याचे संकेत देत असले तरी महाविकास आघाडीकडून अद्यापही लंके यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही.

लंके यांना उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे सुजय विखेनी देखील लंके यांना धारेवर धरत खोचक टोला लागावला आहे निवडणुकीची इच्छा व्यक्त करणे आणि त्याचे वास्तविकते मध्ये रूपांतर होणे यात मोठा फरक असतो विखेंनी लंकेना लागवलेला टोला हा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आणखीन बरेच घडामोडी घडविणार असल्याचे बोलले जातं आहे….

  1. ↩︎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
× How can I help you?