खासदार सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालणार ; त्या कार्यकर्त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरलं
अहमदनगर – अहमदनगर दक्षिण मतदारसंघांचे महायुतिचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालणार असल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पारनेर तालुक्यात राहणारे सुजय विखेंचे कार्यकर्ते असलेले माजी उपसरपंच यांना ही धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात अद्यापही पारनेर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच जोर धरू लागली आहे. निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवाराकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी सोशल मीडियाचा देखील पुरेपूर वापर करून घेतला जातं आहे. मात्र ज्या सोशल मीडियावर एकमेकांवर चिखलफेक केली जाते त्याच सोशल मीडियावर सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालणार असल्याची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरलं झाली आहे. त्यामुळे ऑडिओ क्लिप मध्ये सुजय विखे यांना कार्यकर्त्याच्या माध्यमातुन गोळ्या घालण्याची धमकी देणारा कोण याबाबत पोलिसांनी सखोल तपास करणे गरजेचे आहे.
खरंतर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुरु असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एखाद्या उमेदवाराला जीवे ठार मारण्याइतपत मजल कोणाची जातं असेल तर अहमदनगरच्या कायदा व सुव्यवस्थेचा किती बोजवारा उडाला आहे हे या ऑडिओ क्लिपवरून सिद्ध होत आहे. वास्तविक निवडणुकीत सत्तेच्या लाचारीसाठी एखाद्या उमेदवाराला संपविण्या इतपत मजल जातं असेल तर साऊथ इंडियन चित्रपटला लाजवेल अश्या घटना अहमदनगर मध्ये घडत असल्याच वास्तव नाकरता येणार नाही हे मात्र नक्की…..