वाहतूक शाखेची आबरु चव्हाट्यावर आणणारा आमजत आहे तरी कोण? वाहतूक शाखेच्या नावाखाली मांडला उच्चाद? वरिष्ठ करणार का कारवाई
अहमदनगर – अहमदनगर शहरामध्ये आमजत नावाचा दलाल वाहतूक शाखेची आबरु चव्हाट्यावर आणत दलाली करत असल्याची धक्कादायक चर्चा सध्या शहरातील काही रिक्षा चालकांमध्ये सुरु आहे. खरंतर वाहतूक शाखेच्या नावाचा गैरवापर करत दलाली करणाऱ्या आमजत नामक व्यक्तीचा तात्काळ शोध घेऊन वाहतूक शाखेच्या वरिष्ठानी कारवाई करणे गरजेचे असल्याचे बोलले जातं आहे. मात्र तसं होतांना दिसत नसल्याने वाहतूक शाखाचं अश्या दलालांना पाठीशी घालत तर नाही ना अशी शंका शहरातील जनता घेत आहे?
शहरातील भिंगारमार्गे चालणाऱ्या तीन चाकी रिक्षा चालकांकडून आमजत नावाचा दलाल हे वाहतूक शाखेच्या नावाखाली दलाली मागत असल्याच बोललं जातं आहे? या आधीदेखील आमजतची चर्चा गावभर झाली मात्र वाहतूक शाखेकडून कोणतीही कारवाई झाली नाही. आता पुन्हा आमजत नावाचा दलाल हा रिक्षा चालकांना वाहतूक शाखेच्या नावाखाली त्रास देत असल्याची चर्चा सुरु आहे? त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारापेक्षा जास्त या आमजत नामक व्यक्तीची चर्चा असून आमजत आहे तरी कोण याचा तपास करून वाहतूक शाखेची आबरू चव्हाट्यावर आणणाऱ्या या आमजत नामक व्यक्तीवर कारवाई होणार का हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.
खरंतर गेल्या काही दिवसापूर्वीच आमजत नावाची एकच चर्चा सुरु होती. वाहतूक शाखेची आबरु चव्हाट्यावर आणण्याचे काम या आमजत नामक व्यक्तीकडून होत होते अशी चर्चा सुरु असतांनाच अचानकपणे या चर्चाना ब्रेक लागला होता. मात्र आता पुन्हा आमजत नामक व्यक्तीची चर्चा सुरु झाली असून आमजत आहे तरी कोण हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून वाहतूक शाखेचे नाव खराब करणाऱ्या या आमजतचा शोध घेऊन त्यावर तात्काळ वरिष्ठानी कारवाई करावी अशी मागणी आता जनतेमधून व्यक्त होत आहे….